Sharad Pawar : विधानसभेला महाविकास आघाडीच्या किती जागा? शरद पवार यांनी थेट आकडाच सांगितला…

Sharad Pawar on Vidhansabha : महाविकास आघाडीने लोकसभेला महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. आता विधानसभेला तर महायुतीचा पार सुपडाच साफ होईल, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याचा थेट आकडाच सांगितला आहे.

Sharad Pawar : विधानसभेला महाविकास आघाडीच्या किती जागा? शरद पवार यांनी थेट आकडाच सांगितला...
शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 3:44 PM

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. महायुतीचे पानीपत होईल याचा स्वप्नात सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील बड्या नेत्यांनी विचार केला नव्हता. पण राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकून शिंदे-फडणवीस-पवार या त्रिमूर्तिला झटका दिला. आता आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने विधानसभेत चमत्कार घडण्याचा दावा केला आहे. आघाडीतील नेत्यांमध्ये सत्तर हत्तींचं बळ आले आहे. विधासभेला महायुतीचा सुपडाच साफ होईल असा दावा शरद पवार करत आहेत.

महाविकास आघाडीला किती जागा

शरद पवार यांनी महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याची आकडेवारीच सादर केली. लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वाय बी. चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत 10 पैकी 08 खासदार निवडून आले आहेत. ही आता खरी सुरुवात झाल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

तर विधानसभेला 288 जागांपैकी 225 पेक्षा जास्त जागांवर  महाविकास आघाडी विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी त्या सगळ्या सोबत घेऊ.. देशात आपले राज्य प्रगत करूयात. विधानसभेला आमच्या 225 जागा निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्यांना मान दिला, त्यांनी घात केला

ज्यांना जनतेने, पक्षांने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केलाय, अशी टीका सुध्दा पवारांनी अजित पवार गटावर केली. निवडणुका झाल्यावर अनेक लोक सोबत येत आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर अनेक लोक सोबत येते आहेत. आजच्या पक्ष प्रवेशाला एक महत्त्व आहे . एक उदगीर आणि देवलाली या ठिकाणी गेल्या वेळी NCP चा उमेदवार निवडून आला होता. त्यांनी मतदारांचा घात केला आहे .त्यांनी आता पक्ष बदलला आहे . या दोन्ही ठिकाणी जे निवडून आले होते त्यांनी जनतेचा घात केला आहे, अशी टीका पवारांनी अजित पवार गटावर केली.

गद्दारांना धडा शिकवा

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लातूरमधील गद्दारांना धडा शिकविण्याची जबाबदारी सुधाकर भालेराव यांच्यावर सोपवली. त्यांच्यावर आमचे अनेक दिवसापासून लक्ष होते. त्या मतदार संघात चल बिचल आमच्या सहकार्याची लक्षात आली होती. मातंग समाज त्याच्या पाठीशी आहे. मला आठवतं 2019 साली मंत्री मंडळ तयार होताना त्यांनी सामाजिक खाते मागितले होते.आमच्या पक्षात तुमच्यामुळे प्रभावी नेतृत्व मिळाले आहे. मराठी माणसाला गद्दारी आवडत नाही. तुम्ही विजय खेचून आणा असे सांगत त्यांनी भालेराव यांना विधानसभेसाठीच जणू लढण्याचे संकेत दिले आहेत.

भालेरावांच्या हाती तुतारी

लातूरमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठा कार्यक्रम होणार आहे उदगीर आणि अहमदपूर मध्ये, देवळाली मतदार संघ येथील सुद्धा नाशिकचे काही लोक आले आहेत. अजित पवार यांच्या सोबत गेलेले काही कार्यकर्ते आज परत येत आहेत नाशिक येथील देवळाली मतदारसंघ काहीही झाले तर जिंकायचा आहे. ही तुतारी आम्ही सुधाकर भालेराव आम्ही तुमच्या हातात देत आहोत. लातूर जिल्ह्यात मदत होईल पण राज्यात सुद्धा मातंग समाज सोबत आला पाहिजे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

विलासरावांची झाली आठवण

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विलासराव देशमुख यांची आठवण काढली. त्यांनी मुख्यमंत्री असताना आघाडीचा धर्म पाळल्याची आठवण त्यांनी काढली. लातूर हा महत्वाचा जिल्हा असल्याचे त्या म्हणाल्या. सुधाकर भालेराव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पक्षा त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.