‘शाहीनबागेत झालं तेच आताही झालं, देशात जाणीवपूर्वक आणीबाणी निर्माण करायचा प्रयत्न होतोय का?’

केंद्र सरकारने योग्यवेळी शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेतल्या असत्या तर आजचा काळा दिवस उगवलाच नसता. | Sanjay Raut

'शाहीनबागेत झालं तेच आताही झालं, देशात जाणीवपूर्वक आणीबाणी निर्माण करायचा प्रयत्न होतोय का?'
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 5:00 PM

मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) लागलेले हिंसक वळण पाहता देशात जाणीवपूर्वक आणीबाणीची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा संशय उत्पन्न होत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. गेल्यावर्षी शाहीनबागेच्या निमित्ताने अशीच परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. देशात वारंवार अशी परिस्थिती निर्माण करणं, हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. (repeated attempt to bring emergency in country says sanjay raut)

ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाच्या हाताळणीवर ताशेरे ओढले. केंद्र सरकारने योग्यवेळी शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेतल्या असत्या तर आजचा काळा दिवस उगवलाच नसता. शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने ट्रॅक्टर रॅली काढण्याचे आश्वासन पाळले नाही. मात्र, त्यामुळे हिंसाचाराची जबाबदारी फक्त शेतकऱ्यांवर ढकलता येणार नाही. या परिस्थितीसाठी दोन्ही पक्ष जबाबदार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

‘आता भाजपवाले शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जो बायडन यांचा राजीनामा मागणार का?’

आजच्या घटनेनंतर दिल्लीत एखादा दुसरा पक्ष सत्तेत असता तर भाजपकडून प्रमुखांचा राजीनामा मागितला गेला असता. मग आता भाजपचे नेते आजच्या घटनेनंतर कोणाचा राजीनामा मागणार? ते ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे की जो बायडन यांचा राजीनामा मागणार, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

‘हे सर्व सरकारच्या अहंकारामुळे घडलं’

शेतकऱ्यांचा संयम तुटत असताना सरकारची काहीच जबाबदारी नव्हती का? कायदा नेमका कुणासाठी? शेतकऱ्यांचं ऐकलं जात नसेल तर तो कायदा कुणासाठी झालाय, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. दिल्लीच्या रस्त्यावर आज जी अराजकता निर्माण झाली आहे त्यासाठी केंद्र सरकारचा अहंकार जबाबदार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनेच ही परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

‘राजीनामा तो बनता है साहेब; संजय राऊत यांची मागणी’

दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी आंदोलनामागे कोणती अदृश्य शक्ती राजकारण करत आहे?, असा सवाल करतानाच दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राजीनामा तो बनता है साहेब, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांचा रोख थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच दिशेने असल्याने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील

Delhi Farmer Protest : दगडफेक, लाठीचार्ज ते घमासान, शेतकरी आंदोलनातील 10 मोठ्या घडामोडी

Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

मग शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का?; शेतकरी नेते टिकैत यांचा संतप्त सवाल

(repeated attempt to bring emergency in country says sanjay raut)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.