AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी ढसाढसा रडले, नंतर बेपत्ता परतल्यावर श्रीनिवास वनगा यांचे सूरच बदलले

shrinivas vanga: आपला बळी कोणी घेतला, त्यांची नावे वनगा यांनी सांगितली. ते म्हणाले, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझा बळी घेतला आहे. साहेब त्यांच्यावर कारवाई करतील अशी खात्री आहे. मी प्रामाणिक राहून काम करेल.

आधी ढसाढसा रडले, नंतर बेपत्ता परतल्यावर श्रीनिवास वनगा यांचे सूरच बदलले
श्रीनिवास वानगा
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 02, 2024 | 9:41 AM
Share

शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांमध्ये ते होते. त्यातील 39 आमदारांनी पुन्हा तिकीट देण्यात आले. परंतु श्रीनिवास वनगा यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे नाराज झालेले श्रीनिवास वनगा 28 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. ते आता चार दिवसानंतर घरी परतले. ते कुठे गेले होते? का गेले होते? त्याची कारणे त्यांनी सांगितली.

श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर ते अज्ञातस्थळी गेले होते. त्यांना शिंदे गटाने पालघरमधून उमेदवारी नाकारली होती. चार दिवस बेपत्ता राहिल्यानंतर परतले. बॉडीगार्ड नव्हते. कुठे होते माहीत नव्हते. पण बुधवारी त्यांनी घरच्यांशी संपर्क केला होता. नातेवाईकांकडे असल्याचे त्यांनी सांगितलं होते.

कुठे गेले होते श्रीनिवास वनगा

मी दोन दिवस बाहेर होतो. मी नातेवाईकांकडे होतो. घराच्या आसपासच होतो. मला अपेक्षा होती पालघर किंवा डहाणूत उमेदवारी मिळेल. मी नाराज होतो. भावनेतून बोललो. मी ठाकरे गटाच्या संपर्कात नव्हतो. रागाच्या भरात मी नातेवाईकांकडे गेलो होतो, असे श्रीनिवास वनगा यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.

श्रीनिवास वनगा आता उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे का? त्यावर ते म्हणाले, मी सध्या कोणाला भेटणार नाही. माझी भूमिका काही नाही. फक्त शंभुराजेंशी मी बोललो. माझे तिकीट कापण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले. मी प्रामाणिक होतो. माझा बळी घेणाऱ्यांवर शिंदे साहेबांनी कारवाई करावी, हीच माझी अपेक्षा आहे. शिंदे साहेब जे सांगतील ते मी करेल.

विधान परिषदेची आशा नाही

आपला बळी कोणी घेतला, त्यांची नावे वनगा यांनी सांगितली. ते म्हणाले, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझा बळी घेतला आहे. साहेब त्यांच्यावर कारवाई करतील अशी खात्री आहे. मी प्रामाणिक राहून काम करेल. कालपासून मुलाची तब्येत बरी नाही. प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही. मला माझ्या कुटुंबासाठी जगायचे आहे. राजकीय भूमिका काय घेणार? हे पुढे बघेन, असे ते म्हणाले. मला विधान परिषदेची आशा नाही, असे त्यांनी म्हटले.

Follow Us
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?