AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तास्थापन्यापूर्वीच महायुतीत जुंपली, शिवसेना अन् राष्ट्रवादीत शाब्दीक वॉर

ncp shiv sena: महेंद्र थोरवे काठावर वाचले. मी त्यांना फारसा महत्त्व देत नाही. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नये. यश नम्रतेने स्वीकारायचा हवे. मी 82 ते 83 हजार मताधिक्याने निवडून आली आहे. पण या यशचा स्वीकार आम्ही नम्रतेने करत आहोत.

सत्तास्थापन्यापूर्वीच महायुतीत जुंपली, शिवसेना अन् राष्ट्रवादीत शाब्दीक वॉर
ncp shiv sena
| Updated on: Nov 27, 2024 | 12:05 PM
Share

ncp shiv sena: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचवेळी महायुतीमधील खदखद बाहेर येत आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दीक वॉर सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चर्चेत आला आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला आता सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, असा सल्ला आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना दिला आहे.

काय म्हणाले महेंद्र थोरवे

महेंद्र थोरवे काठावर वाचले आहेत‌. जरा का इकडे तिकडे झाले असते तर मग त्यांना त्यांची जागा कळली असती. असा खोचक टोला रोहेकरांच्या भेटीला आलेल्या आदिती तटकरे यांनी लगावलाय. कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर आरोप लावले होते. विजयानंतर बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले होते की, माझा पराभव करण्यासाठी अनेक अदृश्य शक्ती कार्यरत होत्या. महायुतीत असूनही त्यांनी मला पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. परंतु त्यांचा हा डाव माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी उलटवला. माझा विजय झाला आणि माझ्या मतदासंघातून सुनील तटकरे यांचा पराभव झाला.

आदिती तटकरे यांचा पलटवार

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी गद्दारी केली, या थोरवे यांच्या वक्तव्यावर सुनील तटकरे यांच्या कन्या आणि श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, महेंद्र थोरवे काठावर वाचले. मी त्यांना फारसा महत्त्व देत नाही. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नये. यश नम्रतेने स्वीकारायचा हवे. मी 82 ते 83 हजार मताधिक्याने निवडून आली आहे. पण या यशचा स्वीकार आम्ही नम्रतेने करत आहोत.

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, यश किती डोक्यात जाऊ द्यायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे. राज्यात आता महायुतीचे सरकार येत आहे. आमच्या पक्षातून कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवणार आहे. स्थानिक आमदार हे ठरवत नाही.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.