AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उद्धव ठाकरे यांचा झालाय लोटा”; शिवसेनेच्या नेत्याने राजकारणातील ठाकरेंना मोडीत काढलं

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आहे. त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटत आहे, त्याच स्वप्नात ते वावरत आहे. त्यामुळे त्यांना आता त्याच स्वप्नात वावरू द्या असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांचा झालाय लोटा; शिवसेनेच्या नेत्याने राजकारणातील ठाकरेंना मोडीत काढलं
| Updated on: Apr 25, 2023 | 9:25 PM
Share

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी, मालेगाव, औरंगाबाद, नागपूर अशा सभा झाल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या सभेला उत्तर प्रत्युत्तर देत सभा घेण्यात आल्या. त्या सभेवरूनच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी खेडच्या सभेनंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. ज्या उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये येऊन सभा घेतली त्या सभेपेक्षा पाच पटीने मी सभा घेऊन त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे अशा शब्दात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेतली असली तरी त्या सभेमध्ये ज्या लोकांन बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, त्याच लोकांना घेऊन त्यांनी खेडमध्ये सभा घेतली होती.

त्यामुळेच आता त्यांच्या सभेला गद्दारांची सभा अशा शब्दात लोकांनी त्यांच्यावर टीका केली असल्याचे मतही रामदास कदम यांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा पाच पटीने मी रत्नागिरीमध्य सभा घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता तरी समजलं असेल आमची ताकद काय आहे ती अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांनी सध्या ज्यांच्या हातात हात घालून सभा घेत आहेत. त्या सर्वानी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

जे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्या गद्दारांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली, त्यामुळे उद्धव ठाकरे हे गद्दारांचे शहेनशहा आहेत का असा खोचक सवालही रामदास कदम यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी आहे. त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटत आहे, त्याच स्वप्नात ते वावरत आहे. त्यामुळे त्यांना आता त्याच स्वप्नात वावरू द्या असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा आता या राजकारणात लोटा झाला आहे अशी टीका करत त्यांनी भास्करराव जाधव यांना तिनपाट नेता म्हणूनही त्यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.