शिवसेना उपनेते कामगारांचे लढाऊ नेतृत्व सूर्यकांत महाडिक यांचं निधन

भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक यांचे सोवमारी रात्री साडेआठ वाजता निधन झाले. (Suryakannat Mahadik died)

  • गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 11:05 AM, 12 Jan 2021
Suryakant Mahadik died
सूर्यकांत महाडिक, शिवसेना उपनेते

मुंबई: शिवसेनेचे (Shivsena)कट्टर समर्थक उपनेते आणि कामगार सेनेचे नेते सूर्यकांत महाडिक (Suryakant Mahadik) यांचं चेबूर घाटला येथे सोमवारी(11 जानेवारी) रात्री साडे आठ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. सूर्यंकांत महाडिक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी विविध कामगार यूनियनचं नेतृत्व केले. सूर्यकांत महाडिक हे जवळपास 5 हजार कामगार यूनियनचा कारभार पाहत असंत. त्यांचे वय 75 वर्ष होते. (Shivsena leader and Bhartiya Kamgar Sena president Suryakant Mahadik died )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडिक यांच्या पार्थिवाचं दर्शन घेणार

सूर्यकांत महाडिक यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कामगार नेते सुर्यकांत माहाडीक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चेंबूर घाटला येथे त्यांच्या निवासस्थानी येणार आहेत.त्यामुळे परिसराला एखाद्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. यानंतर सूर्यकांत महाडिक यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी रवाना होणार आहे. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आदरांजली

सूर्यकांत महाडिक यांची कारकीर्द

कामगारांचे प्रश्न मांडणाऱ्या सूर्यकांत महाडिक यांच्या रुपानं शिवसेनेला नेहरुनगर विधानसभा मतदारसंघात पहिला आमदार मिळाला. 1990 सूर्यकांत महाडिक नेहरूनगरमधून विजयी झाले. त्यांनी दोनवेळा नेहरुनगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केले. राजकीय जबाबदारी समर्थपणे सांभाळल्यानंतर सूर्यकांत महाडिक 2003 मध्ये भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून 17 वर्षे सूर्यकांत महाडिक कामगारांच्या प्रश्नासाठी झटत राहिले.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

रिझर्व्ह बँक कर्मचारी असोसिएशनमध्ये विशेष काम

सूर्यकांत महाडिक यांनी ऑल इंडिया रिझर्व्ह बँक कर्मचारी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम केले. महाडिक यांनी रिझर्व्ह बँकेतील कामगारांसाठी विशेष काम केले. कामगारांचे प्रश्न घेऊन त्यांनी अनेक वेळा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. आयडीबीआय बँकेतील कामगारांचेही अनेक प्रश्न महाडिक यांनी यशस्वीरीत्या सोडवले होते.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सूर्यकांत महाडिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. “सूर्यकांत महाडिक आणि मी एकत्र काम केले आहे लोकांच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र सरकार वर तुटून पडायचो”. माझा जवळचा मित्र इतक्या लवकर गेला,अशा शब्दात नांदगावकर यांनी महाडिक यांना आदरांजली वाहिली.

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

या फोटोची चर्चा मुंबईत का आहे? मुख्यमंत्र्यांकडून मान की..वाचा सविस्तर प्रकरण

(Shivsena leader and Bhartiya Kamgar Sena president Suryakant Mahadik died )