ही बाळासाहेबांचीच शिवसेना, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का? : शिवसेना

ही बाळासाहेबांचीच शिवसेना, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का? : शिवसेना

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या शिवसेनेवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे (Arvind Sawant on Rajnath Singh criticism of Shivsena).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 09, 2020 | 4:38 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या शिवसेनेवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे (Arvind Sawant on Rajnath Singh criticism of Shivsena). ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे. मात्र, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का? असा प्रश्न विचारत अरविंद सावंत यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं. तुम्ही परवा बिहारचा बिगुल वाजवला आणि 70 हजार एलईडी लावून प्रचार सुरु केला. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नये. ही राजकारणाची वेळ नसल्याचं सांगत पीएम केअर फंडाचं काय झालं, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

अरविंद सावंत म्हणाले, “तुम्ही राजकारणात व्यापार मांडलाय. तो पहा मध्यप्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर कर्नाटकात तुम्ही काय केलं. तुम्ही अंतर्मुख झालं पाहिजे. आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतो की हा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा भाजप आहे का? शिवसेना आणि सत्ता असं काही नाही. सत्ता हे आमचं साधन आहे साध्य नाही. वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तशीच आहे. त्याच विचारांनी काम करत आहे.”

“शरद पवार हे देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी दौरा केला तर तुमच्या पोटात ढवळण्याची काही गरज नाही. त्याचं स्वागत केलं पाहिजे. राजकारण करायची ही वेळ नाही. देश आणि विश्व एका विषाणूने त्रस्त झालाय. त्याच्यावर मात करायची गरज आहे. तुम्ही परवा बिहारचा बिगुल वाजवला. 70 हजार एलईडी लावून तुम्ही प्रचार सुरु केला. पीएम केअर फंडाचं काय झालं त्याची माहिती कळलं तर बरं होईल,” असंही अरविंद सावंत म्हणाले.

अरविंद सावंत म्हणाले, “माननीय राजनाथसिंग आम्हाला सर्वांना आदरणीय आहेत. त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही. पण मुळात ते शिवसेनेवर बोलतात तेव्हा दुःख होतं. तेव्हा स्पष्टपणे मांडणे गरजेचे आहे. शिवसेनेने आयुष्यात कोणाला धोका दिला नाही. शिवसेनेला अनेक लोकांनी धोका दिलाय. शब्द न पाळणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये.”

संबंधित बातम्या :

सत्तेच्या लालसेतून शिवसेनेकडून धोका, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार नव्हे, सर्कस : राजनाथ सिंह

रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री लोकशाही सरकारला ‘सर्कस’ म्हणतात : नवाब मलिक

Arvind Sawant on Rajnath Singh criticism of Shivsena

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें