AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी… हिंदीवरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर या नेत्याचा घणाघात

Hindi Language Dispute : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात वातावरण तापले आहे. शिक्षण क्षेत्रात हिंदीची ही सक्तीची घुसखोरी वादात अडकली आहे. त्यावरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने आले आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत.

तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी... हिंदीवरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर या नेत्याचा घणाघात
हिंदीवरून सेनेतील दोन्ही गट आमने-सामनेImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 18, 2025 | 9:09 AM
Share

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात वातावरण तापले आहे. शिक्षण क्षेत्रात हिंदीची ही सक्तीची घुसखोरी वादात अडकली आहे. मनसेच नाही तर उद्धव ठाकरे शिवसेनेने सुद्धा या हिंदीच्या सक्तीकरणाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यावरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने आले आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

ही तर मातृभाषेशी गद्दारी

उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सरकारच्या भूमिकेवर आणि संजय शिरसाट यांच्यावर तुफान हल्लाबोल चढवला आहे. यामध्ये सरकारला काही प्रश्न सुद्धा विचारण्यात आले आहे. सरकारने कोणत्या आधारे ही सक्ती केली असा सवाल करण्यात आला आहे.

स्वार्थासाठी गद्दारी फक्त पक्षाशी करून थांबला नाहीत, शिरसाट तुम्ही तर महाराष्ट्राशी,आपल्या मातृभाषेशी पण गद्दारी करत आहात, असा घणाघात चित्रे यांनी केला. भाषांसंदर्भात घटनेत काय म्हटलंय,हे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला माहीत नसणे ही तर शोकांतिका आहे, असा चिमटा चित्रे यांनी काढला. तर हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून प्रचार करणाऱ्या बेजबाबदार राज्यकर्त्यांसाठी त्यांनी माहिती सुद्धा दिली आहे.

हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही

भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 मधील पहिल्या अनुच्छेदानुसार हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची अधिकृत किंवा कामकाजाची भाषा असेल, असं घटनेत सांगण्यात आलंय, असे चित्रे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

कलम 345 नुसार घटनेनं प्रत्येक राज्याला स्वत:ची अधिकृत आणि कामकाजाची भाषा ठरवण्याचाही अधिकार दिला आहे. घटनेच्या आठव्या शेड्युलमध्ये भारतातील अधिकृत भाषांची एक यादी आहे. त्यामध्ये मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, बंगाली, काश्मिरी, अशा 22 भाषांचा समावेश आहे, अशी यादी चित्रे यांनी संजय शिरसाट यांच्यासाठी दिली आहे. यावर आता संजय शिरसाट हे काय बोलतात हे लवकरच समोर येईल.

लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.