स्कायमेटची खुशखबर, यंदा मान्सून सामान्य राहणार!

मुंबई: हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था स्कायमेटने यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज (Preliminary Monsoon Forecast Guidance for 2019’) वर्तवला आहे. पहिल्या अंदाजात स्कायमेटने शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे. मान्सूनच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहील. इतकंच नाही तर यंदा दुष्काळाची शक्यता अत्यंत कमी आहे. तसंच पावसाचे हुकमी महिने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, अशी शक्यता […]

स्कायमेटची खुशखबर, यंदा मान्सून सामान्य राहणार!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई: हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था स्कायमेटने यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज (Preliminary Monsoon Forecast Guidance for 2019’) वर्तवला आहे. पहिल्या अंदाजात स्कायमेटने शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे. मान्सूनच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहील. इतकंच नाही तर यंदा दुष्काळाची शक्यता अत्यंत कमी आहे. तसंच पावसाचे हुकमी महिने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, अशी शक्यता 50 टक्क्यांहून जास्त आहे.

भारतात 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं. पावसाळी चार महिन्यात गेल्या 50 वर्षात सरासरी 89 सेमी पाऊस झाला. देशात वर्षभरात होणारा 70 टक्के  पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो.

स्कायमेटने वर्तवलेला हा यंदाच्या वर्षातील पहिलाच अंदाज आहे, त्यामध्ये आगामी काळात बदल होऊ शकतो. 15 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान स्कायमेटकडून अंतिम मान्सूनचा अंदाज वर्तवला जातो.

गेल्या वर्षी 2018 मध्ये जुलै, सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी 91 टक्के होती. हवामान विभागाने 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे अनेक भागात दुष्काळाचं चित्र आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तर हे भयाण चित्र पाहायला मिळतं.

Non Stop LIVE Update
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.