Mumbai Bus | मुंबईत बेस्टच्या ताफ्यात लवकरच 900 डबलडेकर बसेस, कमी पैशात किफायतशीर प्रवास होणार

Mumbai Bus | मुंबईत बेस्टच्या ताफ्यात लवकरच 900 डबलडेकर बसेस, कमी पैशात किफायतशीर प्रवास होणार
DOUBLE DECKER BUSES

बसमधील प्रवास सुखकर व्हावा म्हणून बेस्ट समितीने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता मुंबईकरांच्या सेवेत लवकरच डबल डेकर बसेस दाखल होणार आहेत. या बसेसमुळे बेस्ट बसेसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 26, 2022 | 12:33 PM

मुंबई : बसमधील प्रवास सुखकर व्हावा म्हणून बेस्ट समितीने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता मुंबईकरांच्या सेवेत लवकरच डबलडेकर बसेस (Double Decker Bus) दाखल होणार आहेत. या बसेसमुळे बेस्ट बसेसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा (Mumbai) प्रवास सुखकर होणार आहे. गुरुवारी बेस्ट (Best) समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अगोदर 200 दुमजली बसेसचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र त्यानंतर 900 बसेसचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यात आला. त्यामुळे आगामी काही वर्षात मुंबईमध्ये डबलडेकर बसेस दाखल होणार आहेत.

900 दुमजली बसेसचा प्रस्ताव मंजूर 

मुंबईमध्ये मागील काही वर्षात अनेक बदल झाले आहेत. या काळात लोकसंख्यादेखील वाढली. पूर्वी मुंबईमध्ये बेस्टच्या ताफ्यात काही डबलडेकर बसेस होत्या मात्र कालांतराने या बसेस कमी झाल्या. आता पुन्हा एकदा बेस्टच्या समितीत 200 बसेस सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी भूमिका घेऊन जास्तीत जास्त डबलडेकर बसेस मुंबईकरांच्या सेवेत असण्याची गरज व्यक्त केली. त्यानंतर 900 दुमजली बसेसचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यात आला.

यावर्षी 225 बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार 

मंजूर करण्यात आलेल्या सर्व डबलडेकर बसेस वातानुकुलीत तसेच विजेवर चालणाऱ्या आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात 225 डबलडेकर बस दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी 25 टक्के बसेस पुढच्या काळात बेस्टकडे येतील. साधारणत: 21 महिन्यात सर्व 900 बसेस बेस्टकडे असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जास्त प्रवासी बसमधून प्रवास करणार

दरम्यान, बेस्टच्या ताफ्यात डबलडेकर बसेस आल्यामुळे प्रवाशी क्षमतेत वाढ होणार आहे. नव्याने दाखल होणाऱ्या एका दुमजली बसमध्ये 78 प्रवासी एकाच वेळी प्रवास करु शकतात. यामध्ये 65 प्रवाशांना बसून तर उर्वरित प्रवाशांनी उभे राहून प्रवास करण्याची या डबलडेकर बसमध्ये सोय करण्यात आलेली आहे. जवळजवळ 15 वर्षांपूर्वी बेस्टकडे 900 डबलडेकर बसेस होत्या. कालांतराने त्यांची संख्या कमी झाली.

इतर बातम्या :

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री बॅक इन ॲक्शन, उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्कवरील प्रजासत्ताक दिन सोहळ्याला हजेरी, अडीच महिन्यात काय घडलं?

Kishori Pednekar : भाजप म्हणतंय संपूर्ण मुंबई काबीज करणार, त्यांचे केवळ दोन तीन नगरसेवक सक्रिय, किशोरी पेडणेकर यांचा टोला

शिवसेना की ‘लाचारसेना’? उद्यानाला हिंदुद्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव खपवून घेणार नाही-भाजप


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें