Special Story | मुलांच्या आयुष्यात आनंदाचा इंद्रधनुष्य साकारणाऱ्या आई-बाबांची दिवाळी वृद्धाश्रमात का?

ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं ते म्हणजे आपले आई-वडील. पालक हे प्रत्येक मुलासाठी त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे असतात कारण, त्याशिवाय त्यांचं काहीही अस्तित्व नसतं. आई-बाबाच असतात जे आपल्याला चालायला, बोलायला शिकवतात. पण, अनेक आई-बाबांना प्रत्येक वर्षीची दिवाळी वृद्धाश्रमात साजरी करावी लागते ते ही मुलं कर्तृत्ववान असूनही!

Special Story | मुलांच्या आयुष्यात आनंदाचा इंद्रधनुष्य साकारणाऱ्या आई-बाबांची दिवाळी वृद्धाश्रमात का?
Old Age Home Special Story
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 6:42 AM

मुंबई : ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं ते म्हणजे आपले आई-वडील (Parents). पालक हे प्रत्येक मुलासाठी त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे असतात कारण, त्याशिवाय त्यांचं काहीही अस्तित्व नसतं. आई-बाबाच असतात जे आपल्याला चालायला, बोलायला शिकवतात. पण, अनेक आई-बाबांना प्रत्येक वर्षीची दिवाळी वृद्धाश्रमात साजरी करावी लागते ते ही मुलं कर्तृत्ववान असूनही!

आयुष्यात ज्या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी जीवन तेजोमय केले, अशा कुटुंबातील कुलदिपक या जन्मदात्यांनाच विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रुपाने त्यांना मिणमिणती पणतीही दाखवित नाहीत. दिवाळीच्या पर्वावर आपल्याला आपली मुलं घरी नेतील का? अशी आशा वृद्धाश्रमातील त्या प्रत्येक पालकाच्या डोळ्यात पाणावलेली पाहायला मिळेल ज्यांनी आपल्या मुलांसाठी स्वत:च आयुष्य बाजुला सारलं.

महाराष्ट्रात शेकडो वृद्धाश्रम कार्यरत आहेत. या वृद्धाश्रमांमध्ये हजारो निराधार वृद्ध आश्रयाला आहेत. दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त आपल्या मुलांनी, नातेवाईकांनी आपल्यालाही घरी न्यावे म्हणून वृद्धाश्रमातील वृद्ध डोळ्यात आशेचे दिवे प्रज्वलित करुन बसले आहेत.

राज्यात मोजक्याच अनुदानावर मोजके वृद्धाश्रम सुरळीतपणे सुरु आहेत. समाजाचे ऋण फेडावे या हेतूने स्वखर्चाने राज्यात अनेक वृद्धाश्रम कार्यरत आहेत. संपुर्ण आयुष्यात कुलदिपकासाठी किती कष्ट घेतले, याची बेरीज, वजाबाकी हे वृद्ध मांडतात. सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नाते संबंधातील प्रेम, जिव्हाला संपला आहे.

पैशाने सर्व काही विकत घेता येत हो…

पैशाने सर्व काही विकत घेता येत हो… मात्र, आई वडिलांच्याचं खरे निर्मळ प्रेमाची खरी किंमत कोण ठरवणार. आई-वडिलांचं प्रेम विकत घेता येत नाही. हेच आजची पिढी विसरली आहे. या पिढीला पाहिजे ते शिक्षण, हवा तेवढा पैसा मिळत आहे. मात्र, आजची पिढी खोटी प्रतिष्ठा आणि वंशाचे दिवे जपत आहे.

ज्यांनी तळहाताला चटके घेत त्यांना मोठे केले. आज ते आम्हाला विसरले आहे. त्यामुळे वृद्धाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवायची वेळ आणली आहे. अशा मुलांना दिपावलीच्या सायंकाळी आनंदाने दिवे लावतांना वृद्ध आई वडिलांची आठवण होणार काय? चिमुकल्या हातांना धरुन दिपावलीचा दिवा, फटाके कसे लावायचे या गोष्टी जन्मदात्यांनी शिकविल्या त्या आई वडिलांची दिपावली वृद्धाश्रमात साजरी होत आहे. याचे काहीच वाटत नसेल काय?

निराधार बापाचं दु:ख

“लहानपणी या कुलदिपकाला दिवाळीचे फटाके, फराळ, कपडे मिळावे म्हणून मी आपल्या जिवाचा आटा पिटा केला. आज तो मोठा झाल्यावर आम्हाला विसरला आहे. दिवाळीसारख्या सणाला आम्हाला घरी नेण्यास दरवर्षी टाळले जाते. आयुष्यातील संध्याकाळ साजरी करताना आपल्या कुटुंबाचा मुख्यत्वे मुलांचा आधार असावा लागतो. मात्र, वृद्धापकाळात आमच्या सारख्या आई-वडिलांना आश्रमाचा आधार घ्यावा लगत” असं दु:ख एका निराधार बापाने व्यक्त केलंय.

“वंशाच्या दिव्याला जन्म देताना आईला असह्य कळा सोसाव्या लागतात. आयुष्याचा आधार मिळेल, मृत्यूनंतर याच कुलदिपकाच्या खांद्यावर शेवटची विश्रांती यात्रा पूर्ण होईल, अशी आशा प्रत्येक आई वडिलांची असते. मात्र, लग्न झाल्याबरोबर याच कुलदिपकांनी आपल्याला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. वर्षातून केवळ दहा मिनिटं आपल्याला ते भेटायला येतात, नातवंडांना खांद्यावर खेळवण्याऐवजी दु:खाचे अश्रू पुसत जीवन जगावे लागत आहे”, अशी कैफियत एका वृद्धेने मांडली.

जन्म देऊनही पोटच्या गोळ्याने नाकारले. आई वडिलांचा सांभाळ करता येत नाही, अशांनी आपल्या जन्मदात्याला वृद्धाश्रमात टाकले. त्यांची दिवाळी अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने साजरी केली जाते. खूप मन कठोर करुन हे वृद्ध अखेरच्या वयात आपल्या मुला मुलींची आस धरुन बसले आहेत.

आपल्याच मुलांनी आपल्याला नाकारले याहून मोठं दु:ख आई-वडिलांसाठी नाही. मात्र, मुलांनी नाकारल्याने या वृद्धांना वृद्धाआश्रमाची वाट धरावी लागली आहे, हे त्यांच्या पदरी पडलेलं जगातील सर्वात मोठं दु:ख आहे असंच म्हणावं लागेल.

राज्यात किती वृध्दाश्रम?

ज्येष्ठ नागरिकांना वृध्दापकाळ चांगल्याप्रकारे घालविता यावा याकरिता “वृध्दाश्रम” ही योजना सन 1963 पासून स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येते. या वृध्दाश्रमामध्ये 60 वर्ष वय असलेले पुरूष आणि 55 वर्ष वय असलेल्या स्त्रियांना प्रवेश देण्यात येतो. या योजनेशिवाय ज्येष्ठ नागरिकांना वृध्दाश्रमामध्ये काही अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून “मातोश्री वृध्दाश्रम”, ही योजना सरकारच्या आदेशानंतर 17 नोव्हेंबर, 1995 अन्वये स्वयंसेवी संस्थामार्फत सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यात सध्या 24 मातोश्री वृध्दाश्रम विना अनुदान तत्वावर सुरु आहेत. वृध्दाश्रमात प्रवेशितांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात.

प्रत्येक मातोश्री वृध्दाश्रमाची मान्य संख्या 100 इतकी असून यामध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्या ज्येष्ठ नागरिकांचे, स्वत:चे वार्षिक उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांचेकडून प्रतिमहा 500 रुपये शुल्क आकारुन प्रवेश देण्यात येतो. तर ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न त्यापेक्षा कमी आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.

पण, हे फक्त शासन निर्मित वृद्धाश्रम आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे असे एकूण नेमके किती वृद्धाश्रम आहेत, याचा आकडा सध्या उपलब्ध नाही. तरी राज्यातील वृद्धाश्रमांची वाढती संख्या बदलत्या सामाजिक स्थितीवर प्रश्न उपस्थित करणारे आहे.

संबंधित बातम्या :

Special Story | पाऊस अन् सोसाट्याचा वारा, हत्तीवर बसून ‘बेलची’ला निघाल्या, इंदिरा गांधींचा असा दौरा ज्याने राजकारण बदलून टाकलं

#Tv9Vishesh | Gulzar यांचा ‘जय हो’ संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला आणि…

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.