AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकारची चाचपणी, रेल्वेला पत्र

सामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार हे अद्याप अस्पष्टच आहे. सरकारने सध्या फक्त शक्यतांवर प्रतिसाद मागितला आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकारची चाचपणी, रेल्वेला पत्र
| Updated on: Oct 28, 2020 | 6:30 PM
Share

मुंबई : सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नसून रेल्वे मंत्रालयाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे. (State Government writes to Railway Ministry on resuming Mumbai Local service for ordinary people)

कोव्हिडशी संबंधित सर्व काळजी घेऊन सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवासाची परवानगी देण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. त्यासाठी विविध टप्प्यांत वेळा निश्चित करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतील. तर सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत पुन्हा सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

संध्याकाळी पाच ते साडेसात या वेळेतही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतील. तर रात्री आठनंतर शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्य प्रवासी लोकलने जाऊ शकतील, असे सरकारचे नियोजन आहे. महिलांसाठी दर तासाला विशेष लोकल असेल. यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची विनंतीही सरकारने केली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांची स्वाक्षरी पत्राखाली आहे. सामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार हे अद्याप अस्पष्टच आहे. सरकारने सध्या फक्त शक्यतांवर प्रतिसाद मागितला आहे.

कसे असतील टप्पे?

दिवसभरात 3 टप्प्यांत प्रवासाची परवानगी देण्याची विचारणा सकाळी 7.30 पासून सामान्यांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती सकाळी 8 ते साडेदहा पर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत सामान्यांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती संध्याकाळी 5 ते 7.30 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रात्री 8 ते शेवटच्या लोकलपर्यंत सामान्यांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती महिलांसाठी दर तासाला एक लोकल देण्याची विनंती

“आम्ही येत्या काही दिवसांत लोकल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेऊ. याबाबत आमची चर्चा सुरु आहे. आम्ही लवकरच मुंबईकरांना दिलासा देऊ”, असं उत्तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी ट्विटरवर एका युझरला दिलं होतं. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास मुंबईकरांची लाईफलाईन रुळावर येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

महिलांसाठी लोकल सुरु

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन बंद आहे. सरकार अनलॉकच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकलची सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर गेल्या आठवड्यात सरकारकडून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरु व्हाव्यात, अशी सामान्य लोकांची मागणी आहे. तेव्हा आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या :

लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?

(State Government writes to Railway Ministry on resuming Mumbai Local service for ordinary people)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.