AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी शुभारंभ, ॲड. यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे मंगळवारी 15 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सन 2021-22 वर्षासाठी राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी शुभारंभ केला जाणार आहे.

मुंबईत राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी शुभारंभ, ॲड. यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 2:48 AM
Share

मुंबई : राज्यस्तरीय बाल आधार (Baal Adhar) नोंदणी शुभारंभ आणि नागरी बाल विकास केंद्र पथदर्शी कार्यक्रमाचा आढावा आणि विस्तार योजनेचा शुभारंभ मंगळवारी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, भारत सरकारच्या युआयडीएआयचे उपसंचालक सुमनेश जोशी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, युनिसेफच्या पोषण विशेषज्ञ राजलक्ष्मी नायर उपस्थित रहाणार आहेत. (State level baal aadhar registration launched in Mumbai)

महाआयटी हे आधार नोंदणी एजन्सी म्हणून काम करणार

महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे मंगळवारी 15 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सन 2021-22 वर्षासाठी राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी शुभारंभ केला जाणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षात प्रत्येक बाल विकास प्रकल्प कार्यालयास 3 याप्रमाणे 1659 आधार नोंदणी संच राज्यातील सर्व 553 बाल विकास प्रकल्प कार्यालयांना पुरवठा करुन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. महाआयटी हे आधार नोंदणी एजन्सी म्हणून काम करणार आहे. या आधार नोंदणी एजन्सीद्वारे 100% बालकांची आधार नोंदणी पुर्णत्वास येणार आहे.

तसेच राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या आदेशानुसार मुंबईत एकूण 71 नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित करण्यात आली होती. मुंबईतील एम पूर्व व एम पश्चिम या प्रभागामध्ये अति कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे समजल्यानंतर चेंबूर, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, ट्रॉम्बे व मुलुंड पूर्व या 6 प्रकल्पांमधील या मुलांवर उपचार करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी), तसेच मुलांचे वजन, उंची, दंड घेर याची बालरोग तज्ञांकडून तपासणी करून, अति तीव्र कुपोषित मुलांची नोंद करून या मुलांच्या पालकांना आहार तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले होते. अशा मुंबईतील नागरी बाल विकास केंद्र पथदर्शी कार्यक्रमाचा आढावा घेऊन आवश्यक ठिकाणी या केंद्राचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून कुपोषण मुक्तीच्या दृष्टीने यापुढील काळात विविध योजना राबविण्यात येतील.

इतर बातम्या 

Supriya Sule on Inflation : महागाईच्या मुद्द्यावरुन सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा, आकडेवारी मांडत केली महत्वाची मागणी

माझे नाव अमजद खान का? नाना पटोलेंचा सवाल, नेत्यांना मुस्लिम नावं देत फोन टॅपिंग का केली? उत्तर मिळेल?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.