AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer : राज्यावरील शेतकरी आत्महत्येचा कलंक काही पुसेना; आकडेवारीने वाढवली चिंता, या विभागात परिस्थिती बिकट

Farmers Cases Alarm : राज्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक काही केल्या पुसता येत नसल्याचे चित्र आहे. यावर्षीच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. गेल्या चार महिन्यातील आकडेवारीने शेती, शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असल्याचे समोर आले आहे.

Farmer : राज्यावरील शेतकरी आत्महत्येचा कलंक काही पुसेना; आकडेवारीने वाढवली चिंता, या विभागात परिस्थिती बिकट
शेतकरी आत्महत्येने वाढवली चिंता
| Edited By: | Updated on: Jun 28, 2024 | 10:17 AM
Share

राज्याच्या भाळी असलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक काही केल्या पुसता आलेला नाही. यंत्रणा, प्रशासन, सरकार सर्वच सपशेल फेल ठरले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नीसह १९८६ मध्ये पहिली आत्महत्या केल्याची नोंद आहे. तेव्हापासून आतापर्यंत आत्महत्येच्या चक्राला ब्रेक लागला नाही. मध्यंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांनी देशाला हादरवून सोडले होते. अजूनही परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे दिसून येत नाही. यावर्षातील आत्महत्याचा आकडा चिंता वाढविणार आहे.

चार महिन्यातील आकडेवारी चिंताजनक

राज्यात २०२४ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत राज्यात ८३८ शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत २०८, मार्चमध्ये २१५ आणि एप्रिलमध्ये १८० आत्महत्या झाल्याची नोंद समोर आली आहे. या चार महिन्यांत दररोज सरासरी ७ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अमरावती विभागात सर्वाधिक आत्महत्या

राज्यातील अमरावती विभागात सर्वाधिक ३८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, छत्रपती संभाजीनगर विभागात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात ८४,शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.कोकणात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत.

या चार महिन्यांत अमरावतीमध्ये ११६, यवतमाळमध्ये १०८, वाशिममध्ये ७७, जळगावमध्ये ६२, बीडमध्ये ५९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४, धाराशिवमध्ये ४२, वर्धामध्ये ३९, नांदेडमध्ये ४१, बुलढाण्यात १८, धुळ्यामध्ये १६, तर अहमदनगरमध्ये १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

आर्थिक मदतीसाठी प्रतिक्षा

तर दुसरीकडे ८३८ पैकी यात १७१ शेतकरी आत्महत्या प्रकरणे वैध आढळली. त्यात आतापर्यंत फक्त १०४ शेतकऱ्यांनाचं १ लाख आर्थिक मदत सरकारकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर ६२ शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. त्याचबरोबर ६०५ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. राज्यात आरोप प्रत्यारोप आणि पळवा पळवीच्या राजकारणात सरकार व्यस्त असल्याने शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही ? असा सवाल शेतकरी कुटुंबियांकडून केला जात आहे.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?