BJP : भाजपाला झटका, 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

BJP : भाजपाला झटका, 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!
ऑर्केस्ट्रा बारमधील परफॉर्मन्ससाठीची महाराष्ट्र सरकारची 'ही' अट रद्द

5 जुलै 2021ला भाजपा(BJP)च्या 12 आमदारांनी गदारोळ घातला. सुप्रीम कोर्टा(Supreme Court)तूनही त्यांना आता झटका बसलाय. 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय. आशिष शेलारां(Ashish Shelar)नी ही माहिती दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 14, 2021 | 9:52 PM

मुंबई : 5 जुलै 2021ला भाजपा(BJP)च्या 12 आमदारांनी केलेला हा गदारोळ. याच 12 आमदारांना सुप्रीम कोर्टा(Supreme Court)तूनही झटका बसलाय. 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. मात्र विधीमंडळाकडे निलंबनाच्या निर्णयाचा, फेरविचार करण्याची मुभा दिल्याचं आशिष शेलारां(Ashish Shelar)नी सांगितलंय.

ओबीसीं(OBC)चा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून छगन भुजबळां(Chhagan Bhujbal)नी विधानसभेत ठराव मांडला. त्याचवेळी विधानसभेत भाजपाच्या आमदारांनी जोरदार हंगामा केला. अध्यक्षस्थानी, तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव होते. गदारोळ सुरू असतानाच भाजपाचे आमदार संजय कुटेंनी अध्यक्षांचा माइक ओढला. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात आई-बहिणीवरून भाजपाच्या आमदारांनी शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप भास्कर जाधवांनी केला होता.

संजय कुटे, आशिष शेलार, योगेश सागर, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीयांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत, भाजपानं 4-2 असा महाविकास आघाडीवर विजय मिळवला..मात्र आमदारांच्या निलंबनावरुन सुप्रीम कोर्टात मात्र झटका बसला. आता 11 जानेवारीच्या पुढच्या सुनावणीकडे लक्ष असेल.

Amit Shah : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह येणार महाराष्ट्र दौऱ्यावर, काय घोषणा करणार?

Sharad Pawar : यूपीएचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पवारांच्या चेहऱ्यावर सहमती होतेय? ममता काय करणार?

बिपीन रावतांच्या मेव्हण्याच्या जमिनीवर मध्यप्रदेश सरकारचा बुलडोझर; सोशल मीडियावर टाकली पोस्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें