AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! … तरच आम्ही पाठिंबा देऊ, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, मोदी सरकारने अर्धी लढाई जिंकली? मतदारसंघ पुनर्रचना…

Supriya Sule on Delimitation Bill: उन्हाळी अधिवेशनात मोदी सरकारला जे साध्य करता आलेले नाही, ते लक्ष्य आता दृष्टिक्षेपात असल्याचे मानले जात आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवार राष्ट्रवादी, उद्धव सेना यासह इतर पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार का?

मोठी बातमी! ... तरच आम्ही पाठिंबा देऊ, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, मोदी सरकारने अर्धी लढाई जिंकली? मतदारसंघ पुनर्रचना...
तरच आम्ही पाठिंबा देऊ, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
| Edited By: | Updated on: Jul 15, 2026 | 10:31 AM
Share

Supriya Sule on Delimitation Bill: महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर होण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढावली होती. पण त्यानंतर मोदी सरकारने कंबर कसली. आता पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा एकदा समोर आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर INDIA आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचा सूर मावळल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी विरोधाची तलवार म्यान केल्याची माहिती समोर येत आहे. काही अटी आणि शर्तींवर शरद पवार यांची राष्ट्रवादीच नाहीतर इतर पक्षातील नेतेही या विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासादार सुप्रिया सुळे यांनी याविषयीचे मोठे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

तर डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा

मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकात देशात ५० टक्के जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास शरद पवार यांची राष्ट्रवादी विधेयकाला पाठिंबा देणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शाह यांच्याकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा झाली होती. या चर्चेत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेच नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, काँग्रेस आणि डीएमके यांनी देखील होकार दिल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे या अधिवेशनात विधेयक आल्यास पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. या नवीन घडामोडींमुळे मोदी सरकारला सत्तर हत्तींचे बळ मिळणार आहे. त्यांनी आताच अर्धी लढाई जिंकल्याचे मानले जात आहे. तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांसाठी हा मोठा झटका मानलसा जात आहे.

INDIA आघाडीत फूट?

उन्हाळी अधिवेशनात INDIA आघाडीची एकजूट दिसली होती. सरकारने हरएक प्रयत्न करूनही महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर सरकारला विरोधकांचे मन वळवता आले नाही. हे विधेयक म्हणजे एकाधिकारशाहीकडे जाणारे पहिले पाऊल असल्याचा विरोधकांचा आरोप होता. त्यावेळी शरद पवार राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, डीएमके, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी काँग्रेससोबत जात या विधेयकाविरोधात मतदान केले होते. गेल्या 12 वर्षात मोदी सरकारचे एकही विधेयक कधीच बारगळले नव्हते. विरोधकांनी त्यांच्या होकारात हाकारे पिटले होते. पण पहिल्यांदाच मोदी सरकारला झटका बसला. उन्हाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक बहुमताने मंजूर होऊ शकले नाही. ते नामंजूर झाले. तेव्हापासून देशातील दोन राज्यात पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण तापले. तृणमूलचे 22 हून अधिक खासदार फुटले. तर उद्धव सेनेचे 6 खासदार फुटले आहेत. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही खासदार आणि आमदारांचा एक गट हा सत्तेसोबत जाण्याचा आग्रह धरत असल्याने काही तडजोडींवर पाठिंबा देण्याची खेळी खेळल्या जात असल्याचे मानले जात आहे. अर्थात आज सुप्रिया सुळे दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यात याविषयीचे चित्र स्पष्ट होईल.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप