AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन दाखवा, विरोधी पक्षनेत्याचे पालिका आयुक्तांना आव्हान

अनधिकृत  बांधकामावर कारवाई करून पालिका आयुक्तांनी आपले प्रशासनावर पकड असल्याचे सिद्ध करून दाखवावे. तसेच पालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरु असून हा भ्रष्टाचार पालिका आयुक्तांनी रोखून दाखवावा असे आव्हान मुंबई महानगपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केले आहे.

मुंबईतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन दाखवा, विरोधी पक्षनेत्याचे पालिका आयुक्तांना आव्हान
मुंबई महापालिका
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 11:25 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घालू नका असे म्हटले आहे. मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसारादरम्यान गेल्या दीड वर्षात 84 हजार 364 अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी आल्या आहेत. या अनधिकृत  बांधकामावर कारवाई करून पालिका आयुक्तांनी आपले प्रशासनावर पकड असल्याचे सिद्ध करून दाखवावे. तसेच पालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरु असून हा भ्रष्टाचार पालिका आयुक्तांनी रोखून दाखवावा असे आव्हान मुंबई महानगपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केले आहे.

कारवाई करुन दाखवा  

नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील अनधिकृत बांधकामावर करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, कारवाई करा असे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. मुंबईमध्ये गेल्या दीड वर्षात 84 हजार 264 अनधिकृत बांधकामे झाल्याची नोंद पालिककडे नोंद आहे. त्यापैकी 5 टक्के बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने कोर्टाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नका असे म्हटले होते. आता कोर्टाने आपले आदेश मागे घेत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्ष तसेच पालिकेतील विरोधी पक्ष आपल्यासोबत असल्याने या अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करून दाखवावी असे आव्हान रवी राजा यांनी केले.

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा 

आमच्याकडे अनेक अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी येतात. त्या आम्ही कारवाईसाठी आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठवतो. कारवाई न झाल्यास आयुक्तांची भेट घेतो. आयुक्त अधिकाऱ्यांना फोन करतात. मात्र अधिकारी आयुक्तांना चुकीची माहिती देतात. पालिकेतील काही अधिकारी खूप चांगले काम करत आहेत. मात्र काही अधिकारी अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालत आहेत. पालिकेच्या डी विभागामधून के वेस्ट विभागात व नंतर मालमत्ता विभागात बदली झालेले सहाय्य्क आयुक्त, येत्या तीन दिवसात निवृत्त होणारे उपायुक्त, डी विभागात कार्यरत असलेले काही अधिकारी असे अनेक अधिकारी याची उदाहरणे आहेत. त्यांच्यावर पालिका आयुक्तांनी कारवाई करावी, असे आवाहन रवी राजा यांनी केले. एखाद्या झोपडी धारकारने बांधकाम केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र मोठ्या इमारतींमध्ये जे बांधकाम होते त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते, असे रवी राजा म्हणाले.

बदल्यांमध्ये भ्रष्टाचार

पालिकेमध्ये अभियंत्यांच्या बदल्या या सिटी इंजिनियर किंवा संचालकांकडून केल्या जातात. या बदल्या करताना अनेक अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. पालिकेतील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्याची गरज आहे. त्यासाठी पालिका आयुक्तांना पत्र दिले असल्याचे रवी राजा यांनी सांगितले. पालिकेच्या सिटी वर्क्स कमिटीमध्ये अभियंत्यांच्या पदोन्नतीचे काल रात्री प्रस्ताव आले. आज सकाळी ते प्रस्ताव मंजूर झाले. असे या पदोन्नतीमध्ये काय होते असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

इतर बातम्या :

जालन्यात बुलडाणा अर्बन बँकेवर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत भर दिवसा बँक लुटली

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे! राज्य सरकारकडून एसटी कामगारांच्या महत्वाच्या मागण्या मान्य

Rajinikanth Health Update | सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल

take action against unauthorized construction in mumbai municipal corporation Leader of Opposition challenges Municipal Commissioner

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.