Tauktae cyclone | येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, मुंबईसह इतर जिल्ह्यांची स्थिती काय?

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. (Tauktae cyclone Effect All Over Maharashtra)

Tauktae cyclone | येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, मुंबईसह इतर जिल्ह्यांची स्थिती काय?
Cyclone Tauktae
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 8:42 AM

Tauktae cyclone मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. (Tauktae cyclone Effect All Over Maharashtra)

महाराष्ट्रात अलर्ट जारी

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे येत्या 12 तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे.

या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटला आहे. अनेक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील स्थिती काय? 

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी काळ्या ढगांची  गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत काल रात्रीपासून प्रचंड गार वारा सुटला होता. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दक्षिण मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सद्यस्थितीत मुंबईत काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सूर्यदेवाचे दर्शन होण्याची शक्यता कमी आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील स्थिती काय? 

‘तौत्के’ चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन जिल्ह्यात ऑरेंज झोन जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा रोख गुजरातच्या दिशेने असला तरीही हे वादळ कोकण किनारपट्टी भागातून पुढे सरकरणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

रत्नागिरी आमि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 15 व 16 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी 15 आणि 16 मे या काळात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

औरंगाबादेत तुरळक पाऊस 

औरंगाबाद शहरात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळाचा औरंगाबादलाही फटका बसला आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहे. पुढील तीन ते चार दिवस अशाचप्रकारे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

चक्रीवादळाचे परिणाम 

  • मुंबई, ठाणे, पालघर – पावसाच्या हलक्या सरी
  • कोकण –  मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा
  • रायगड – मोठा पाऊस
  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा- तुरळक पाऊस
  • विदर्भ – मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

(Tauktae cyclone Effect All Over Maharashtra)

संबंधित बातम्या : 

Tauktae Cyclone | मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, दक्षिण मुंबई, उपनगरात पावसाच्या सरी

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात सतर्कता बाळगा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर, महाराष्ट्रात कुठे काय परिणाम?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.