ठाकरे सरकार सिटी बँकेच्या खातेदारांना न्याय मिळवून देणार का? मातोश्रीसमोर बॅनरबाजी

ठाकरे सरकार सिटी बँकेच्या खातेदारांना न्याय मिळवून देणार का? मातोश्रीसमोर बॅनरबाजी

ठाकरे सरकार सामान्य नागरिकांचे पैसे परत मिळवून देणार का? असे काही प्रश्न या बॅनरवर विचारण्यात आले आहेत.

Namrata Patil

|

Jan 13, 2020 | 1:40 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार सिटी को. ऑपरेटिव बँकेच्या खातेदारांना न्याय मिळवून देणार का? असे प्रश्न विचारणारे बॅनर शिवसेना भवन परिसरात लावण्यात आले (City bank poster at mumbai)  आहेत. मुंबईत शिवसेना भवन, मंत्रालय, मातोश्री, शिवसेनेच्या शाखेसमोर अशाप्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत.

या बॅनरवर शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, अभिजीत अडसूळ, समीर चव्हाण या तिघांचे फोटोही लावण्यात आले आहेत. यात तिघांनी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत घोटाळे केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करुन खातेदारांना न्याय मिळवून देणार का? असे प्रश्न या बॅनरवर विचारण्यात आले आहेत.

18 एप्रिल 2018 पासून रिझर्व्ह बँकेने दि सिटी को-ऑप. बँकेवर निर्बंध घातले. ते आजपर्यंत कायम आहेत. त्या धक्क्याने एकूण 11 खातेदार मृत्यूमुखी पडले. त्यांच्या परिवाराला न्याय मिळणार का?

पीएमसी बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात समाविष्ट असलेल्या संचालक आणि कार्यकारी अधिकाऱ्यांना त्वरित अटक झाली. पण दि सिटी बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ जे शिवसेना नेते सुद्धा आहेत. त्यांची आणि बँकेच्या संचालक मंडळाची ईडीमार्फत चौकशी करुन ठाकरे सरकार त्यांना गजाआड करणार का?

माजी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत दि सिटी को. ऑप बँकेचे विलिनीकरण करणार असल्याचे सांगितले होते. ते विलिनीकरण करुन ठाकरे सरकार सामान्य नागरिकांचे पैसे परत मिळवून देणार का? असे काही प्रश्न या बॅनरवर विचारण्यात आले आहेत.

दरम्यान ही बॅनरबाजी नेमकी कोणी केली? ती बँकेच्या खातेदारांनी केली आहे का? याची अद्याप कोणतीही माहिती (City bank poster at mumbai)  समोर आलेली नाही.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें