AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alert: मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला, तापमानातही अचानक वाढ, वाचा काय सांगतात नोंदी, कोणती आहेत कारणं?

रविवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता 245 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली. मुंबईत दिवाळीच्या दिवसांमध्येही एवढी हवेची गुणवत्ता घसरली नव्हती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता 164 एक्यूआय आणि पाडव्याच्या दिवळी 221 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली होती.

Alert:  मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला, तापमानातही अचानक वाढ, वाचा काय सांगतात नोंदी, कोणती आहेत कारणं?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 10:39 AM
Share

मुंबईः हिवाळ्यात थंड, निरोगी हवेमुळे वातावरण आरोग्यदायी ठरते. मात्र मुंबईत सध्या काहीचे विपरीत चित्र पहायला मिळत आहे. मुंबईत दिवसाच्या तापमानात अचानक वाढ झालेली दिसून येत आहे. दिवसाचे तापमान 35.2 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. अचानक वाढलेल्या तापमानासोबतच मुंबईच्या हवेची गुणवत्ताही घसरल्याचे दिसून येत आहे. रविवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता 245 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली. मुंबईत दिवाळीच्या दिवसांमध्येही एवढी हवेची गुणवत्ता घसरली नव्हती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता 164 एक्यूआय आणि पाडव्याच्या दिवळी 221 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली होती.

गरम हवेच्या प्रवाहांनी वाढला मुंबईचा पारा

मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील किमान तापमान 20 अंश सेल्सियसच्या खाली गेले होते. मुंबईत हिवाळ्याची सुरुवात झाल्याची जाणीवही झाली होती. मात्र रविवारी किमान आणि कमाल तापमानात अचानक वाढ झाली. सोमवारी शहराचे कमाल तापमान 32.8 अंश सेल्सियस आणि उपनगराचे तापमान 35.2 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले. तर शहराचे किमान तापमान 25 अंश सेल्सियस आणि उपनगराचे तापमान 24.4 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले.

कुलाब्यात सर्वाधिक प्रदुषित हवा

मुंबईत कुलाब्यात सर्वाधिक 345 एक्यूआय एवढी प्रदुषित हवा असल्याची नोंद झाली आहे. तर त्यानंतर माझगावमध्ये 325, बीकेसीमध्ये 314 आणि मालाडमध्ये हवेची गुणवत्ता 306 एक्युआय एवढी नोंदवण्यात आली आहे. हवेची ही गुणवत्ता सर्वात घातक गटातील आहे. तसेच अंधेरीमध्येही हवेची गुणवत्ता 259 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक जास्त असल्यास, अशी हवा आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अस्थमा किंवा श्वासासंबंधी आजार असलेल्या रुग्णांनी जसेत लहान मुले व ज्येष्ठांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

हवामानात असा बदल का?

हवामानातील बदलांचे आकलन करणारी संस्था स्कायमेटमधील हवामान तज्ज्ञांच्या मते, नैऋत्येकडून उष्ण हवेचे प्रवाह सुरु झाले आहेत. त्यामुळे शहरातील तापमानातही वाढ झाली आहे. आता 21 किंवा 22 नोव्हेंबरनंतरच तापमानात काहीशी घसरण पहायला मिळेल. तसेच कर्नाटकच्या किनारी भागात एक वादळसदृश स्थिती तयार होत असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारी भागात म्हणजेच मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे, असा अंदाज स्कायमेट संस्थेचे प्रमुख हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी सांगितले.

इतर बातम्या-

देश ऐतिहासिक वळणावर, सौरभ कृपाल पहिले समलैंगिक जज होण्याची शक्यता, कॉलेजियमची शिफारस

बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.