Varsha Raut | वर्षा राऊत ED चौकशीला सामोऱ्या जाणार ?

वर्षा राऊत यांनी EDला पत्र पाठवून चौकशीला अधिकचा वेळ मागून घेतल्याची बातमी समोर आली होती. पण असं कुठलंही पत्र EDला पाठवण्यात आलं नाही. तसंच वर्षा राऊत आज EDला सामोऱ्या जाणार का? याबाबतही अद्याप निर्णय झाला नसल्याचं सुनील राऊत म्हणाले.

Varsha Raut | वर्षा राऊत ED चौकशीला सामोऱ्या जाणार ?
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 10:25 AM

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ED कडून नोटीस बजावण्यात आली आहे. 55 लाखाच्या व्यवहाराप्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर वर्षा राऊत आज ED कार्यालयात चौकशीला जाणार का?, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊत यांनी सांगितलं आहे. आम्ही चर्चा करत आहोत. लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असंही राऊत म्हणाले. तसंच आम्ही EDला कोणतंही पत्र दिलं नसल्याचंही सुनील राऊतांनी सांगितलं. (There is no letter from Varsha Raut to ED – Sunil Raut)

वर्षा राऊत यांनी EDला पत्र पाठवून चौकशीला अधिकचा वेळ मागून घेतल्याची बातमी समोर आली होती. पण असं कुठलंही पत्र EDला पाठवण्यात आलं नाही. तसंच वर्षा राऊत आज EDला सामोऱ्या जाणार का? याबाबतही अद्याप निर्णय झाला नसल्याचं सुनील राऊत म्हणाले. वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण HDILशी संबंधित आहे. HDILच्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक केली होत. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होतं. पण पुढे या प्रकरणाचा तपास EDकडे सोपवण्यात आला. वाधवान बंधूंचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. प्रवीण हे संजय राऊत यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेत. मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका पुनर्विकास प्रकल्पाचं काम HDIL कडून करण्यात येत होतं. त्यात अनियमितता समोर आल्यानंतर वाधवान बंधूंना अटक करण्यात आली.

प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकांऊटमधून पैसे ट्रान्सफर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. त्यासाठीच ED कडून वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

बायकांच्या पदराआडून लढाई का? संजय राऊतांचे 10 मोठे हल्ले

There is no letter from Varsha Raut to ED – Sunil Raut

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.