गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरला; मात्र मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरला; मात्र मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : बंगालच्या उपसागरावर घोंघावणाऱ्या गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरला आहे. हे वादळ दक्षिण ओरिसा आणि आंध्रमध्ये लँडफॉल झाले. या वादळाची तीव्रता कमी होऊन त्याठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मात्र चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबईसह कोकण, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भुत्ते यांनी ही माहिती देत चक्रीवादळाबाबत नवीन अपडेट जारी केला आहे. त्यांनी या अनुषंगाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. मच्छिमारांनी या तीन दिवसांत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे विशेष आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. (Three days of torrential rains in Mumbai and Maharashtra, Meteorological Department forecast)

मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता

गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार आहे. आज तसेच पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. आज गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. मात्र मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने वर्तविली आहे. गुलाब चक्रीवादळाने ओडिशाच्या दक्षिण किनारी भागात आणि आंध्रच्या किनारीपट्टी भागात लँडफॉल केले असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्याला पावसाचा मोठा तडाखा

काल रात्रभर उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावाला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या महिन्यातभरात अधून-मधून पाऊस दमदार बरसला आहे. यामुळे कांदा, सोयाबीन, उडीद, मका, तूर पिकांना सुरुवातीस पोषक वाटणारा पाऊस, आता मात्र खरीप पिकांचा कर्दनकाळ ठरला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कांदा, उडीद, सोयाबीन, मूग, मका, भाजीपाला पाण्यातच सडून जात आहे. यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील रानमसले, वडाळा, नान्नज, पडसाळी, कळमण, गावडी दारफळ, वांगी, शेजारील खुनेश्वर, मोरवंची या परिसरात अशीच अवस्था झाली आहे. सध्या रानमसले परिसरात शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून ओढे, नाले, विहीरी तुडुंब भरुन वाहत आहेत. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.

मे महिन्यात लागोपाठ धडकली होती दोन चक्रीवादळे

यंदा मे महिन्यात लागोपाठ आलेल्या यास आणि तौक्ते चक्रीवादळांनंतर देशात गुलाब नावाचे हे नवे चक्रीवादळ धडकले. ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या दरम्यान भारतीय किनारपट्टीवर हे वादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. याआधी 26 मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशादरम्यान किनारी भागात धडकले होते तर तौक्ते चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकले होते. (Three days of torrential rains in Mumbai and Maharashtra, Meteorological Department forecast)

इतर बातम्या

Milind Soman | तब्बल 26 वर्षानंतर मिलिंद सोमण पुन्हा रॅम्प अवतरला, अभिनेत्याच्या लूक पाहून मलायका झाली अवाक्!

स्वत:चं डिजिटल हेल्थ कार्ड तयार करायचय, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI