Maharashatra News Live : संघटनात्मक परिस्थिती पाहून युतीचा निर्णय घेऊ- फडणवीस
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

आज बहुप्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा थोड्याच वेळात होईल. त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक डावपेच टाकले. हा पुरस्कार मिळण्यासाठी जंग जंग पछाडले. त्यांना त्याचा फायदा होईल का? तर ब्रिटेन आणि भारताचे संबंध नवीन वळणावर येऊन ठेपले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. ओबीसी समाजाचा आज नागपूरमध्ये महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची ते भेट घेतील आणि पुढील आंदोलनाची दिशा सांगतील. तर खासगी कंपन्यांना काम देण्यावरून विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांचा एल्गार सुरूच आहे. सणासुदीत सोने आणि चांदीने ग्राहकांना चांगलाच इंगा दाखवला आहे. काही भागात पावसाची शक्यता आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
