AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगद्याचा 2 किलोमीटर टप्पा पूर्ण, उर्वरित 70 मीटरचे खणन येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होणार

महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अधिपत्याखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाचे काम वेगाने सुरु आहे. प्रकल्‍पाचे जवळपास 50 टक्‍के काम पूर्ण झाले आहे.

Mumbai : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगद्याचा 2 किलोमीटर टप्पा पूर्ण, उर्वरित 70 मीटरचे खणन येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होणार
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगद्याचा 2 किलोमीटर टप्पा पूर्ण
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 8:19 PM
Share

मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात पॅकेज 4 अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान 2.070 किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. यातील पहिल्या बोगद्याचा 2 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर उर्वरित 70 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे.

महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अधिपत्याखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाचे काम वेगाने सुरु आहे. प्रकल्‍पाचे जवळपास 50 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्‍प डिसेंबर, 2023 मध्‍ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाचे मुख्य अभियंता विजय निगोट यांच्या समन्वयातून विविध कामे वेगाने सुरु आहेत.

रस्ता प्रकल्पातील पॅकेज 4 अंतर्गत 2 बोगद्यांचे काम अंतर्भूत

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील पॅकेज 4 अंतर्गत मुख्यत्वे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी 1 अशा एकूण 2 बोगद्यांचे काम अंतर्भूत आहे. हे बोगदे प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) येथे असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत बांधले जात आहेत. तसेच ते ‘मलबार हिल’च्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली 10 मीटर ते 70 मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.

सुरक्षेची व प्रतिबंधात्‍मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना 11 छेद बोगद्यांनी जोडणार

या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्‍येकी 2.070 किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा 12.19 मीटर आहे. या बोगद्यांचे खोदकाम करताना आतल्या बाजूने वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तरीकरण (Concrete Lining) केले जाते. त्‍यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्‍येकी 11 मीटर इतका असणार आहे. दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्‍मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे ए‍कंदर 11 छेद बोगदे (Cross Tunnel / Cross Passages) देखील या बोगद्यांचा भाग असणार आहेत. सदर बोगद्यांसाठी आपत्कालीन नियत्रंण कक्ष असून त्यामध्ये स्वयंचलित यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदर बोगद्यांमध्‍ये ‘सकार्डो’ ही वायूविजन प्रणाली लावली जाणार असून ती भारतामध्‍ये रस्‍ते बोगद्यांसाठी प्रथमच वापरली जाणार आहे.

या बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे संयंत्राच्या सहाय्याने केले जात असून ते भारतातील सर्वात मोठ्या व्‍यासाचे टीबीएम संयंत्र आहे. या संयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे संयंत्र देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. 12.19 मीटर व्यास असणाऱ्या मावळा संयंत्राची उंची 4 मजली इमारती एवढी आहे. तर त्याची लांबी ही तब्बल 80 मीटर एवढी आहे. त्याचे वजन सुमारे 2800 टन इतके असून त्‍याबरोबर वापरण्‍यात येणाऱ्या स्लरी ट्रीटमेंट प्लांट (Slurry Treatment Plant) च्‍या यंत्रसामुग्रीचे वजन सुमारे 600 टन आहे. ‘मावळा’ संयंत्राची पाती दर मिनिटाला साधारणपणे 2.6 वेळा गोलाकार फिरु शकणारी आहेत.

कोस्टल हा महापालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण 10.58 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये 4+4 मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे. एवढेच नव्हे तर वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. त्यासोबत समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरित पट्टयांची निर्मिती देखील होणार आहे.

एकूण तीन पॅकेजमध्ये विभागला आहे संपूर्ण प्रकल्प

एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे. पॅकेज 4 अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपूल ते प्रियदर्शिनी पार्क हे 4.05 किलोमीटर अंतर, पॅकेज 1 अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस हे 3.82 किलोमीटर अंतर आणि पॅकेज 2 मध्ये बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक असे 2.71 किलोमीटर अंतर याप्रमाणे कामाची विभागणी करण्यात आली आहे.

पॅकेज 4 व पॅकेज 1 चे कंत्राटदार मेसर्स लार्सन ऍड टुब्रो लिमिटेड आहेत. तर पॅकेज 2 साठी मेसर्स एचसीसी-एचडीसी (संयुक्त उपक्रम) कंत्राटदार आहेत. प्रत्येक पॅकेजचे पर्यवेक्षण करण्यासाठी एक प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कंत्राटाचा अभियंता म्हणून काम करण्यासाठी एक मुख्य सल्लागार नेमला आहे. (Two Kilometer Phase of Mumbai Coastal Road Project Completed)

इतर बातम्या

New Year Celebration : 31 डिसेंबरला वाहतुकीचे नियम मोडाल तर… मुंबई पोलिसांचा इशारा

Corona Virus : दोन दिवसात कठोर निर्बंध, आरोग्यमंत्र्यांचे संकेत; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.