AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारचा सम्राट अशोक कालीन गुंफेचा बिल्डरांशी सौदा करण्याचा घाट: सोमय्या

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारविरोधात आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. (Uddhav govt is doing scam in the name of Mahakali Caves)

ठाकरे सरकारचा सम्राट अशोक कालीन गुंफेचा बिल्डरांशी सौदा करण्याचा घाट: सोमय्या
| Updated on: Jan 03, 2021 | 12:59 PM
Share

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारविरोधात आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. ठाकरे सरकारने अंधेरी येथील सम्राट अशोक कालीन महाकाली गुंफा बिल्डराच्या घशात घालण्याचा घाट घातल्याचा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच ही गुंफा बिल्डरांच्या घशात घातल्यास त्याविरोधात जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Uddhav govt is doing scam in the name of Mahakali Caves)

किरीट सोमय्या आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काल शनिवारी अंधेरी येथील सम्राट अशोक कालीन प्राचीन महाकाली गुंफेची पाहणी करून दर्शन घेतलं. यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकार ही गुंफा बिल्डरांच्या घशात घालत असल्याचा आरोप केला आहे. आम्ही काल महाकाली गुंफेची पाहणी केली. ही अति प्राचीन गुंफा आहे. सम्राट अशोकाच्या काळातील ही गुंफा आहे. मात्र ठाकरे सरकार शाहिद बलवा आणि अविनाश भोसले या दोन बिल्डरांशी या पवित्र जमिनीचा सौदा करायला निघाले आहेत. आम्ही हे कदापिही होऊ देणार नाही. ही जमीन बिल्डराच्या घशात जाऊ देणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

फडणवीसांनी प्रस्ताव नाकारला होता

महाकाली गुंफा आणि रस्त्यांचा टीडीआर मिळावा म्हणून 26 नोव्हेंबरला ठाकरे सरकारने विशेष जीआर काढला. डिसेंबरमध्ये ऑर्डर सही केली आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. पण देवेंद्र फडणवीस सरकार यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. तरी उद्धव ठाकरे सरकारने तो कसा पास केला. मुंबई महानगरपालिका आयुक्त खोटारडे आहेत. इक्बाल चहल यांची या प्रकरणात हकालपट्टी झाली पाहिजे, असं टीकास्त्र सोमय्यांनी सोडलंय.

गुंफा वाचवण्यासाठी केंद्राशी बोलू

महाकाली गुफा व मंदिराचा सुमारे २०० कोटींचा टीडीआर अनधिकृतपणे बिल्डर अविनाश भोसले, शाहीद बालवा यांच्या कंपनीला मुंबई महापालिका व राज्य सरकारने देण्याचा निर्धार केला आहे. पुरातन विभागाची परवानगी न घेता ही प्रक्रिया करण्यात आली आहे. ऐतिहासिक वास्तू आणि देव-देवळांचा शिवसेनेला विसर पडलाय. महाविकास आघाडीत गेल्यावर शिवसेनेने विचारधारा बदलली. ठाकरे सरकारनं बिल्डरच्या बाजूनं हा निर्णय दिलेला असून, मुंबईकरांशी गद्दारी केलीय. सरकारचं एकही षडयंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.याबाबत केंद्राशी आम्ही बोलणार आहोत. कोर्टाच्या ऑर्डरची ठाकरे सरकार किंमत करत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. (Uddhav govt is doing scam in the name of Mahakali Caves)

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारचा बिल्डरांना टीडीआर देण्याचा घाट; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

“लाभार्थ्यांना उत्तर द्यावेच लागेल,” किरीट सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे फक्त स्टंटमन; बुलेट ट्रेनचं काम कोणीही थांबवू शकत नाही: किरीट सोमय्या

(Uddhav govt is doing scam in the name of Mahakali Caves)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.