AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या तासाभराच्या पावसाने साताऱ्यात हाहा:कार, घरे, झाडे कोलमडली, अख्खी रात्र पावसात भिजत; गावकरी भयभीत

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. कुठे कडाक्याचे उन्ह तर कुठे अवकाळी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले.

अवघ्या तासाभराच्या पावसाने साताऱ्यात हाहा:कार, घरे, झाडे कोलमडली, अख्खी रात्र पावसात भिजत; गावकरी भयभीत
Unseasonal rain
| Updated on: May 14, 2026 | 10:41 AM
Share

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. कुठे पाऊल तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात थैमान घातले. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सातारा शहराला मोठा फटका बसला. काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सुमारे 40 घरांचे नुकसान झाले. या भागात अनेक घरांवर विद्युत पोल आणि झाडे पडली.  तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामध्ये बामनोली जवळच्या शिवसागर जलाशयात दोन पर्यटकांना घेऊन निघालेली बोट बुडाली. दोन्ही पर्यटक पाण्यातून पोहून बाहेर सुखरूप निघाले. मात्र, शिवसागर बोट क्लबमधील बोटीचा चालक बेपत्ता आहे, रुपेश धोंडीबा तांबे असे बोट चालकाचे नाव असून त्याचा शोध घेतला जातोय.

सातारा सदर बाजार लक्ष्मी टेकडी परिसरात सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे येथील 40 घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी रात्री उशिरा आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांसह पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासमवेत नुकसानीची पाहणी केली. परभणीमध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे.

अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे जिंतूर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या महामार्गावर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावाला वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे मोठे झाड उन्मळून पडून रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरच्या तारांवर कोसळले. या घटनेत फिडरच्या तारा तुटून जवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर पडल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलीय. दौंड तालुक्यातील केडगावमध्ये वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह तूफान पावसाची हजेरी लावली. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच अवकाळी पावसाने कहर केला. या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....