राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा अर्थ काय? राजकारणात काय बदल घडतील, तज्ज्ञांचं हे विश्लेषण मराठी माणसाला माहीतच हवं
Raj and Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या पर्वाची सुरुवात होत आहे. 18 वर्षानंतर ठाकरे बंधु पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत. अगदी थोड्याच वेळात विजयी मेळावा सुरू होईल. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा अर्थ काय? राजकारणात काय बदल घडतील, तज्ज्ञांचं हे विश्लेषण, तुम्ही वाचलं का?

महाराष्ट्राचे राजकारण आजच्या विजयी मेळाव्यानंतर कूस बदलणार का? याकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. आज वरळी डोममधून एका मोठ्या पर्वाची सुरुवात होत आहे. 18 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत. अगदी थोड्याच वेळात विजयी मेळावा सुरू होईल. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा अर्थ काय? राजकारणात काय बदल घडतील, तज्ज्ञांनी याविषयीचे विश्लेषण केले आहे.
सेना आणि मनसे पराभूत मानसिकतेतून बाहेर
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येणार याच्या नुसत्या घोषणेनंतर एक प्रकारच्या पराभूत मानसिकतेतून सेना आणि मनसे बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आता एक मानसिक बदल घडलेला आहे. आता वाटत आहे की यामध्ये नवीन काही चैतन्य येणार, असे अचूक विश्लेषण राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी केले आहे. ठाकरे हे मराठी माणसाचा आवाज होतील का, याविषयीची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. त्यावर उन्हाळे यांनी प्रकाश टाकला.
18 ते 20 वर्षानंतर त्यांचे कार्यकते एकमेकांना भेटताना एक वेगळा आनंद दिसत आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की पाशवी बहुमत हाताशी असताना, या ठाकरे बंधूंच्या शिडातील हवा काढून घेण्यासाठी शासनाने शासन निर्णय रद्द केला, ही पण एक महत्वाची प्रमुख घटना आहे, पण तशी हवा काही गेली नाही, दोन ठाकरे एकत्र येणार यांच्यातून राजकारणामध्ये बरेच मोठे बदल येणार्या काळात घडताना दिसतील, असे उन्हाळे म्हणाले.
विशेषतः मराठवड्यासारखा जो भाग आहे, जो शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे, किंवा मुंबई आहे. याठिकाणी बदल झालेला दिसेल. राज ठाकरे यांचे वक्तृत्व आणि विचार करण्याची पद्धत, त्यांचा निर्भीडपणा तरुणांना आकर्षित करणारा आहे, ते गर्दी खेचणारे नेते आहेत, पण मते काही खेचू शकले नाहीत.
एकनाथ शिंदे यांना फटका बसणार?
दुसर्या बाजूला प्रशासन संघटन या सर्वांचा अनुभव असून उद्धव ठाकरे यांचे नेटवर्क आहे जाळे आहे हे जाळे तळागाळापर्यंत पोहोचलेले आहे आणि ते एकनाथ शिंदे मुळे किंवा त्यांच्या शिवसेनेमुळे नष्ट झालेले नाही. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे राजकारणात बराचसा बदल दिसेल आणि याचा फटका शिंदे गटाला बसेल. शिंदे कडे शिवसेनेचे ऑफ शूट आहे, असे ते म्हणाले.
लोकांच्या मनात नेमकं काय?
- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पद्धतीने फुटली ते लोकांना हे मनातून आवडले नाही. म्हणून मराठवाड्यामध्ये आठ पैकी सात जागा या विरोधी पक्षाला मिळाल्या आणि विधानसभेला काय झाले माहित नाही. तरी देखील ठाकरे हा ब्रँड चालतो त्याचं कारण असे आहे की नि:स्वार्थीपणे या भागाचे प्रश्न काही मांडले जातील.
- लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि शेतकर्यांना 6000 रुपये हे चिकट पट्ट्या लावण्याचे काम चालू आहे आणि त्यांना तिथल्या तिथे गप्प करण्याचा प्रयत्न चालू आहे पण मूळ प्रश्न मिटलेला नाही आणि हे चित्र बदलण्यामध्ये दोन ठाकरे एकत्र आले तर एक वेगळे वादळ निर्माण होईल. अर्थात राज ठाकरे यामध्ये किती मनसे म्हणजे मनातून या युतीमध्ये येतात याला जास्त महत्त्व आहे.
- उद्धव ठाकरे यांची नीती स्वच्छ सरळ आहे आणि त्यांचे नेटवर्क आहे त्यांचे काही आमदार आहेत म्हणजे त्यांच्या हाताशी काहीतरी आहे. मनसेचे मंत्र पक्ष म्हणून वीस वर्षात वाढ काही झालेली नाही आणि वीस वर्षाचा काळ हा खूप मोठा असतो, असे उन्हाळे म्हणाले.
अमित ठाकरेंच्या पराभवाची बोचणी
चहा पानाला जाणे जेवणावळी उठवणे हे जे काही सत्ताधारी पक्षाने केले. परंतु अमित ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी काय झाले होते. अमित ठाकरे निवडून आले असते तरी भाजपच्या मनामध्ये सकारात्मक काही आहे असे आपण म्हटलो असतो. परंतु अमित ठाकरे नाही निवडून आणले गेले नाही आणि ही सल राज ठाकरे यांच्या मनातही असली पाहिजे. आणि मला वाटते मनसेची वाट काही भाजप बरोबर राहून होणार नाही म्हणून हे दोन पक्ष आज त्यांनी शून्यातूनही सुरुवात करतो म्हटले तरी शून्यातून शंभरचा आकडा गाठणे हा राजकारणात शक्य आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आणि हे राजकारण महाराष्ट्रामध्ये परसराम मोठा बदल घडवेल आणि याचा अंदाज आल्यामुळे त्याला खोडा घालण्याचा कार्यक्रम चालू आहे. मी दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये चालणारा हा ब्रँड हा कोणीच नाकारू शकत नाही. शहरांना नाव बदलण्याची प्रक्रिया ही बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे संभाजीनगर किंवा धाराशिवाय त्यामुळे ठाकरे यांचा काही याच्यामध्ये कंट्रीब्युशन नसेल असे आपण नाकारू शकत नाही.
भाषावार प्रांत रचनेचा तो मुद्दा
दुसरी महत्वाची गोष्ट माझी भाषा वार प्रांत रचना आपली झालेलीच आहे. त्यामुळे मराठीचा आग्रह धरणे काही चुकीचे नाही उलट महाराष्ट्र हा जास्त लिब्रल आहे. आज मराठी शाळाची परिस्थिती बघितली आणि दुसरीकडे वाचनालय बंद पडत आहेत. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन काही अभिजात घडेल असे काही नाही
विरोधी पक्षाची जागा आज रिकामी आहे आणि विरोधी पक्षनेतेपद आज द्यायला तयार नाहीत आज अशी परिस्थिती आहे आणि असे परिस्थिती निर्माण झाल्या नंतर महाराष्ट्र मध्ये सक्षम असं विरोधी पक्षाचा आवाज निर्माण होईल असे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने होईल असे मला वाटते, असे मत राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी मांडले.
राज्यात बदल होऊ शकतो
ज्या पद्धतीने आज राज्याची अवस्था दिवाळीकडे गेलेली आहे. ही दिवाळी घरी कशामुळे आलेली आहे. हे भाजपाला देखील लक्षात येतं, पण गंमत अशी आहे की एखादी गोष्ट नकोशी झाली तर ती कशी टाळायची हे देखील राजकारणामध्ये गणित असतं. राज ठाकरे मुळे मराठी मध्ये उद्धव ठाकरे यांना भेटणार नाही असे शाप देण्याचे चालू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यामध्ये जन मताचा रेटा कारणीभूत आहे ते काही मनाने एकत्र आलेले नाहीत लोकांच्या मनातील जी भावना आहे त्या भावनेने त्यांना एकत्र आणले आहे. हा जनमताचा रेटाच महाराष्ट्रामध्ये बदल नक्की घडवेल, असे मत उन्हाळे यांनी व्यक्त केले आहे.
अन हिंदी भाषिक मराठी भाषिक मतांची टक्केवारी
हीच मोठी जनतेची बाब आहे की मराठी मतांचा टक्का ज्या मुंबईमध्ये 67 आमदार आहेत. पूर्वी जे मराठी मतांचे प्राबल्य होतं हे कमी झालेला आहे. ही गोष्ट खरी आहे आणि गुजरातींचे प्राबल्य वाढले ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष यात्री भाषा सूत्र मांडत होतं हे सूत्र मांडण्यामध्ये त्यांचा हिंदीला असलेला सपोर्ट होता आणि हे लपून राहिलेले नाही.
मुंबईला एकत्र ठेवण्यामध्ये शिवसेनेचे कॉन्ट्रीब्युशन हे अनेक प्रलयकारी प्रसंगात राहिलेले आहे. त्यामुळे मुंबई मधला मराठी मराठी असा वेदना होता आज बघितले तर मुस्लिमांचा शिवसेनेबद्दलचा तीक्ष्णपण असा फार काही जास्त नाही. जो भारतीय जनता पक्षाबद्दल आहे त्यामुळे एकंदरीत बघितलं तर मुस्लिम समाजाला शिवसेनेबद्दल एक सॉफ्ट करणार आहे.
मुंबई महापालिका आपल्या ताब्यात पाहिजे हे भारतीय जनता पार्टीचे मोठे दिव्य स्वप्न आहे आणि हे स्वप्न त्यांनी बाळगणं हे महासत्ताशाली पक्षाला वाटणार यामध्ये अयोग्य काही नाही परंतु त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करत असताना मराठी आणि हिंदी असा वाद आला मराठीसाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जायचा प्रयत्न केला हा राजकारणामधील बदल घडणार आहे. दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे विरोधी पक्षाचा आवाज पुढे येईल असे तरी सध्या वाटते, असे मत संजीव उन्हाळे यांनी मांडले.
मनसे महाविकास आघाडीसोबत येणार का?
गेली दोन दशकाहून अधिक काळ ठाकरे बंधूंमध्ये संवाद नव्हता. पण मराठीच्या मुद्द्यावरून ते उद्या एकत्र येत आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून भाषिक अस्मितेवरून ते एकत्र आले ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. विजयी मेळावा झाला नसता तर देवेंद्र फडणवीस यांचा राजकारण यशस्वी झाला असता. विजयी मेळावा फक्त ठाकरे बंधूंचा नाही, तर महाविकास आघाडीचा देखील आहे. महाविकास आघाडी मधले तीन प्रमुख पक्ष आणि मनसे असे चार पक्ष व्यासपीठावर असतील असे सांगण्यात आलं आहे. भविष्यात राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत येणार आहेत का हा कुतुहलाचा प्रश्न आहे, असे मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.
मराठी मताची टक्केवारी 30 ते 32 टक्के
मुंबईत मराठीची मतं 30 ते 32 टक्के आहेत. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपच्या मागे असलेला मराठी मतदार वगळता इतर मतदार एकत्र येऊ शकतो. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांना बसणार आहे. फक्त मुंबईच नाही तर एम एम आर डी एरियामध्ये देखील हा फटका बसणार आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मराठी मतदार राहणार नाहीत.
एकनाथ शिंदे यांची मराठी मतदार पेटी दोन्ही ठाकरे बंधू साफ करून टाकतील अजूनही हिंदी साठी देवेंद्र फडणवीस का आग्रही आहेत हे अजूनही समजू शकल नाही. फडणवीस जी कारण देत आहेत ती अत्यंत तकलादु आणि फालतू आहेत. हिंदी बाबत सरकारचे समर्थन चुकीचं आहे, असे मत चोरमारे यांनी मांडले.
पवारांच्या भूमिकेवर काय मत?
शरद पवार यांनी हिंदीचा मुद्दा नीट समजूनच घेतला नाही. हिंदीचा विरोध कोणाचाच नव्हता ते नसलेल्या विषयावर बोलत राहिले. शरद पवार यांनी या मुद्द्याला अनावश्यक फाटे फोडले. महाविकास आघाडी मधले इतर पक्ष जी ठाम भूमिका याबाबतीत घेत होते ती भूमिका शरद पवार घेत नव्हते. मात्र शरद पवार यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला अशा प्रांतिक विषयांमध्ये सुवर्ण मध्ये काढावा लागतो, असे मत चोरमारे यांनी व्यक्त केले.
हा विजय मेळावा घेऊन कुणीही भ्रमात राहण्याची गरज नाही. हा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे रद्द केलेला नाही. यातून सरकारला आणखी काही नवीन संधी देऊ नये. मात्र या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले असं म्हणता येईल, असे ते म्हणाले.