Adv. Gunratna Sadavarte : आज कोर्टात हजर करण्यात येणार, सदावर्तेंचे काय होणार? सातारा पोलीस ताबा घेणार?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वह ओक या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या गुणरत्व सदावर्ते यांच्यासह आठ आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तपासाच्या अनुषंगाने आम्ही सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मागू, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Adv. Gunratna Sadavarte : आज कोर्टात हजर करण्यात येणार, सदावर्तेंचे काय होणार? सातारा पोलीस ताबा घेणार?
गुणरत्न सदावर्तेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 10:12 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Paewar) यांच्या सिल्वह ओक या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांच्यासह आठ आरोपींना आज कोर्टात (Court) हजर करण्यात येणार आहे. तपासाच्या अनुषंगाने आम्ही सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मागू, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, कोर्टाने पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावल्यास सातारा पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेतील. ताबा वॉरेंट घेऊन सातारा पोलीस कोर्टात हजर राहणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. हल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली आहे. हे चार आणि न्यायालयातील कोठडीत असेलेल अन्य चौघे अशा आठ आरोपींना पोलिसांनी मंगळवारी गिरगाव कोर्टात हजर केले होते. कोर्टाने त्या आठही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी गिरगाव कोर्ट परिसरात एफबी लाईव्ह करत असलेल्या सचिदानंद पुरी याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सदावर्तेंचा ड्रायव्हर राम कातकडे तसेच संकेत नेहरकर, रमेश गोरे या तिघांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

सदावर्तेंच्या अडचणीत वाढ

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी ॲड. जयश्री पाटील व अन्य 2 जणांविरुद्ध अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने सदावर्ते यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र एसटी कामगार सेना संघटना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी दाखल केलेल्या तक्रारींमध्ये एसटी महामंडळात बेकायदेशीर पध्दतीने संपाची नोटीस देऊन संपाला सुरवात झाली. संप काळात बहुतांश कर्मचाऱ्यांची राज्य शासनात विलिनीकरणाची इच्छा असल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचारी सदर संपामध्ये सहभागी झाले. त्यामुळे एसटी प्रशासनाने भागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्त व आवेदन कार्यपद्धती इतर प्रशासकीय कार्यवाही करण्यास सुरवात केली. यातच संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित व बदली करण्याचे आदेश राज्य परिवहन प्रशासनाने काढले त्यातून सुटका व्हावी याकरीता कर्मचाऱ्यांमार्फत प्रयत्न सुरु झाले होते.

एसटी कर्मचाऱ्यांकडून गंभीर आरोप

कर्मचाऱ्यांच्या सदर अडचणीचा गैरफायदा घेऊन अजयकुमार बहाद्दरसिंग गुजर (45) आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करुन प्रशासनाद्वारे होत असलेली कार्यवाही रद्द करुन देतो, अशा खोट्या भूलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 300 रुपये तथा 500 रुपये जमा केले असून त्यामध्ये राज्यभरातील जवळपास 70 हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून 3 करोड रुपये गोळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अकोट आगाराचे गजानन रामभाऊ बढे आणि अकोट आगाराच्या इतर कर्मचाऱ्यांद्वारे संकलित केलेले 74 हजार 400 रुपये 14 नोव्हेंबर 2021 रोजी अकोट डेपो येथे वाहक म्हणून नेमणूकीवर असलेल्या प्रफुल्ल गावंडे यांनी अजयकुमार गुजर यांचे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनुसार ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी ॲड. जयश्री पाटील, अजयकुमार गुजर, प्रफुल्ल गावंडे यांच्याविरुद्ध भादवी 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

इतर बातम्या

Vegetable Rate: भाजीपाल्याची उत्पादनावर वाढत्या उन्हाचा परिणाम, आवक घटल्यानंतर काय आहे दराचे चित्र?

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि मालवाहतूक ट्रेलर पलटी; दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे वाहतूक विस्कळीत

पुण्यानंतर आता मुंबईकरांनाही CNG दरवाढीचा फटका; सीएनजीमध्ये पाच तर पीएनजीमध्ये साडेचार रुपयांची वाढ

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.