Mumbai Mayor 2026 : कोण होणार मुंबईची पुढची महिला महापौर? भाजपचे महापौर पदाचे दावेदार कोण? भाजपकडून या महिला नगरसेविकांची नाव चर्चेत
Mumbai Mayor 2026 : मुंबईच महापौरपद हे खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव झालं आहे. त्यामुळे मुंबईच्या पुढच्या महिला महापौर कोण होणार? याची चर्चा सुरु झाली आहे. याआधी सुद्धा अनेक महिला नगरसेविकांनी मुंबईच महापौर भूषवलं आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाई अशी तीन पक्षांची महायुती होती.

आज राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यात मुंबईच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. कारण मुंबईची महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजली जाते. त्याशिवाय मुंबईच्या महापौरपद हे प्रतिष्ठेचं मानलं जातं. आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत मुंबईच महापौरपद हे खुल्या प्रवर्गाला मिळणार हे स्पष्ट झालं आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीतला महापौर होणार आहे. शिवसेना-भाजप महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. दोन्ही पक्षांचे 118 नगरसेवक आहे. बहुमताचा आकडा 114 आहे. त्यामुळे मुंबईचं महापौरपद महायुतीला मिळणार हे निश्चित आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाई अशी तीन पक्षांची महायुती होती.
आतापर्यंत भाजपकडून सातत्याने महायुतीचा महापौर बसेल असं सांगितलं जात होतं. कारण महापौरपदाची आरक्षण सोडत बाकी होती. आता भाजपकडून महापौरपदावर दावा सांगितला जाऊ शकतो. कारण त्यांच्याकडे खुल्या वर्गातील निवडून आलेले अनेक नगरसेवक आहेत. मुंबईच महापौरपद महिलांसाठी राखीव झालं आहे. भाजपकडे मुंबईत अशा अनेक सक्षम महिला नगरसेविका आहेत. महापौरपदासाठी त्यातल्या काही नावांची चर्चा सुरु झाली आहे.
मुंबईतले भाजपचे महापौर पदाचे दावेदार कोण?
राजश्री शिरवडकर
अलका केरकर
हर्षिता नार्वेकर
रितू तावडे
आशा मराठे
शितल गंभीर
योगिता सुनील कोळी यांनी भाजपच्या तिकीटावर मालाडमधून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यांचं नाव महापौर पदासाठी चर्चेत आहे.
मुंबईतील दहीसर येथील वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर निवडून आल्या. त्या दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत जाणार आहेत. मोठ्या मताधिक्क्याने त्यांनी विजय मिळवला. त्याआधी शिवसेनेत होत्या. पण मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपत प्रवेश करुन विजय मिळवला.
भाजपकडे अनेक पर्याय
मुंबई महापालिकेत यंदा एकूण 130 महिला नगरसेविका निवडून आल्या. त्यात भाजपकडे 89 पैकी 49 महिला नगरसेविका आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 65 पैकी 38 महिला नगरसेविका आहेत. मुंबईच्या महापौरपदी महिला विराजमान होणार म्हणून आम्ही चर्चेतली दोन नाव नमूद केली असली, तरी भाजपकडे पालिका प्रशासनाच्या कारभाराचा दीर्घ अनुभव असलेली अनेक महिला नगरसेविका आहेत.
