AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अहो, माझी बायको परत येणार आहे का?’, ‘तो’ रडत-रडत विचारतोय जाब, वरळीतल्या अपघातग्रस्तांना न्याय मिळणार का?

वरळीतल्या हिट अँड रनच्या घटनेमुळे मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एका शिवसेना नेत्याच्या मुलाने एका दाम्पत्याला उडवलं. त्यानंतरही तो थांबला नाही. त्याने महिलेवर गाडी चालवत तिला लांबपर्यंत फरफटत नेलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. अपघातातील आरोपी शिवसेना नेत्याचा मुलगा असल्याची बातमी समोर आलीय. त्यामुळे गरिबांना आता न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मृत महिलेचा पती माध्यमांसमोर आला तेव्हा त्याने अपघाताचा घटनाक्रम सांगितला. यावेळी तो ढसाढसा रडला.

'अहो, माझी बायको परत येणार आहे का?', 'तो' रडत-रडत विचारतोय जाब, वरळीतल्या अपघातग्रस्तांना न्याय मिळणार का?
वरळीतल्या अपघातग्रस्तांना न्याय मिळणार का?
| Updated on: Jul 07, 2024 | 4:41 PM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्याच्या मुलाकडून हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. या घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांच्या मुलाच्या कारने वरळीतील दाम्पत्याला फरफटत नेलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी राजेश शाह यांना ताब्यात घेतलं आहे. पण त्यांचा मुलगा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीचं नाव मिहीर शाह असं असल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपीने अपघातापूर्वी जुहूतल्या एका बारमध्ये मद्यप्राशन केल्याचीदेखील माहिती समोर येत आहे. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा (वय ४५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा हे माध्यमांसमोर आले. यावेळी पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रदीप यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. यावेळी प्रदीप यांना अश्रू अनावर झाले. ते ढसाढसा रडले.

प्रदीप नाखवा नेमकं काय म्हणाले?

“अहो, सकाळी आमची गाडी तिकडून येत होती. मी आणि माझी पत्नी दुचाकीवर होतो. 30 ते 35 च्या वेगाने आम्ही जात होतो. यावेळी अचानक मागून आरोपी गाडी घेऊन आला आणि त्याने आमच्या गाडीला धडक दिली. गाडीला धडकल्यानंतर आम्हाला समजलंच नाही की, काय झालं? आम्ही त्या बोनेटवर पडलो. त्यानंतर आम्ही त्याला हाक मारली की, थांब म्हणून. त्याने पटकन ब्रेक दाबला. ब्रेक मारल्यावर आम्ही दोघं जण खाली पडलो. मी डाव्या हाताला पडलो. तिला खेचणार तेवढ्यात त्याने गाडी तिच्या अंगावरुन नेली आणि तिला फरफटत नेलं. त्याने सीजी हाऊस ते सिलिंग किती अंतर आहे बघा. त्याने तिथपर्यंत तिला फरफटत नेलं. त्या बाईची काय अवस्था झाली असेल ते सांगा”, असं म्हणत प्रदीप रडू लागले.

“दोन मुलं टाकून केली. आमचं कमावणारं कोणी नाही. आमचा मच्छीचा धंदा आहे. आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे. त्या बाईच्या अंगावर कपडे राहिले नाही ते बोला. आज तुम्ही या पक्षाचे, त्या पक्षाचे बोलता, पण तुम्ही पाठीमागून त्यांना सपोर्ट करता. आम्हाला सपोर्ट करायला कोण असतं ते सांगा. आता तुम्ही नाही नाही बोलता, तो प्रवक्ता आला आणि बोलला. आता त्याच्या घरचं कोणी मेलं तर त्याला ते समजेल”, असं प्रदीप रडत-रडत म्हणाले.

“अहो, माझी बायको परत येणार आहे का? ते सांगा. आज ती मोठी लोकं आहेत, मोठ्या लोकांच्या पाठीमागे सगळी दुनिया आहे. गरिबांच्या पाठीमागे कोण आहे ते सांगा. आता तुम्ही सांगा त्याने पक्षाचं स्टिकर खोललं. तुम्ही गाडीचा काच बघा. त्या काचेला तुम्ही परवानगी देता?”, असा सवाल प्रदीप नाखवा यांनी केला.

'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.