YES Bank : लंडनला जाणाऱ्या राणा कपूर यांच्या मुलीला विमानतळावर रोखलं

YES Bank : लंडनला जाणाऱ्या राणा कपूर यांच्या मुलीला विमानतळावर रोखलं

YES बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे (YES Bank Crisis) संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांच्यासोबत आता त्यांच्या कुटुंबावरही संशय आहे.

Nupur Chilkulwar

| Edited By:

Mar 08, 2020 | 9:22 PM

मुंबई : YES बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे (YES Bank Crisis) संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांच्यासोबत आता त्यांच्या कुटुंबावरही संशय आहे. त्यामुळे राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूरला लंडनला जाण्यापासून थांबवण्यात आले आहे. विमानतळावरच रोशनीला अडवले. कपूर यांच्या कुटुंबाविरोधात एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

येस बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे संस्थापक आणि (YES Bank Crisis) माजी सीईओ राणा कपूर यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. शनिवारी 31 तास चौकशी केल्यानंतर ईडीने राणा कपूर यांना अटक केली. त्यानंतर पीएमएलए कोर्टाने त्यांची 11 मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली.

हेही वाचा : Rana Kapoor | ‘YES बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी

राणा कपूर यांच्यासोबतच त्यांची पत्नी बिंदू कपूर, मुलगी राखी कपूर टंडन, राधा कपूर आणि रोशनी कपूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध ईडीने लूकआउट नोटीस बजावली. यानंतर राणा कपूर यांच्या मुलीने देश सोडून लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, मुंबई पोलिसांनी राणा कपूर यांची कन्या रोशनी कपूरला मुंबई विमानतळावर अडवलं. ब्रिटिश एअरवेजने लंडनला निघालेल्या रोशनीला मुंबई पोलिसांनी रोखलं.

ईडीनं राणा कपूर यांच्याविरोधात पैशांची अफरातफर अर्थात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला. येस बँकेच्या स्थितीला बँकेचे तत्कालिन प्रशासन अर्थात राणा कपूरच जबाबदार असल्याचं हळू हळू समोर येतं आहे. येस बँकेतील नियमबाह्य कर्ज वाटपाच्या धोरणामुळेच बँक डबघाईला गेल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं आहे.

येस बँकेवर ही परिस्थिती का आली?

मार्च 2017 पर्यंत येस बँकेकडून 1 लाख 32 हजार 262 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते.

पण मार्च 2019 मध्ये वाटप कर्जाचा आकडा थेट 2 लाख 41 हजार 499 कोटी रुपयांवर गेला

याचा अर्थ 2017 ते 2019 या अवघ्या दोन वर्षात बँकेनं तब्बल 1 लाख 9 हजार 237 कोटी रुपयांचे कर्जवाटप केलं.

विशेष म्हणजे, येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी आपल्या अधिकारात नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचंही समोर येतं. कर्ज वाटप करणे आणि ते वसूल करण्याची प्रक्रियाही त्यांनी ठरवली. आपल्या वैयक्तिक संबंधातून अनेकांना कर्ज वाटप केल्याचंही उघड झालं. एसबीआयनं देखील येस बँकेच्या कर्जवितरण धोरणावर संशय उपस्थित केला.

एकीकडे प्रशासनाच्या गैरव्यवहारामुळे येस बँक आर्थिक संकटाक सापडली असताना बँकेच्या डबघाईने अनेकांच्या अडचणी वाढल्याचं चित्रं आहे. ज्यात राज्यातील 109 बँका, पिंपरी चिंचवड आणि नाशिक महापालिका, विदर्भातील नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा समावेश आहे.

येस बँकेत कुठल्या संस्थेचे किती रुपये अडकले?

– पिंपरी चिंचवड महापालिकेचे 983 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत,. – नाशिक महापालिकेचे 300 कोटी रुपये – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 191 कोटी – आणि विदर्भातील विविध प्रकारच्या 109 बँकांचे पैसे येस बँकेत अडकलेयत… – याशिवाय सिडकोचे गृहप्रकल्पातील लाभार्थींच्या हप्त्यांची सर्व रक्कम ही येस बँकेत अडकलीय

येस बँकेत ठेवी ठेवणाऱ्या राज्यातील 109 बँका डबघाईला आल्यानं अडचणीत सापडल्या आहेत. त्यात विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह काही नागरी बँका आणि काही पत संस्थांचाही समावेश आहे. या बँकांचे सर्व ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले होते. व्यापाऱ्यांनी येस बँकेशी संबंधित (YES Bank Crisis) चेक स्वीकारण्यास नकार दिल्यानं खळबळ उडाली.

संबंधित बातम्या :

घाबरु नका, तुमचे पैसे सुरक्षित, YES बँकेला वाचवण्यासाठी SBI चा मेगाप्लॅन

YES बँकेवर आरबीआयचे निर्बंध, ग्राहकांना 50 हजारच काढता येणार

आरबीआयच्या निर्बंधानंतर ‘Yes बँके’बाहेर मध्यरात्री खातेदारांच्या रांगा

Rana Kapoor | ‘YES बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांच्यावर ईडीची धाड

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें