AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या इक्षु शिंदे यांचा ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ ने सन्मान

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असलेल्या इक्षु शिंदे यांचा अमेरिकेतील गॅरीबे इन्स्टिट्यूटने  ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ ने सन्मान केला आहे.

मुंबईच्या इक्षु शिंदे यांचा ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ ने सन्मान
Ikshu Shinde
| Updated on: Nov 22, 2025 | 9:37 PM
Share

मुंबईतील इक्षु शिंदे यांची अमेरिकेतील गॅरीबे इन्स्टिट्यूट फॉर सॉफ्ट पॉवर आणि पब्लिक डिप्लोमसी या संस्थेमार्फत ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ म्हणून निवड झाली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यास आणि समाजहिताची जाण यांचा समतोल साधणाऱ्या इक्षु यांना हा सन्मान त्यांच्या अभ्यासू कार्यशैली आणि कल्पक दृष्टिकोनामुळे देण्यात आला. इक्षु शिंदे यांना मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असलेल्या इक्षु यांनी शाळेतील शैक्षणिक कामगिरीसोबत सामाजिक सहभागातही आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील निवडणूकी दरम्यान मतदार जागृती उपक्रम राबवल होता. त्यासाठी कार्यशाळा आणि रॅलींचे आयोजन केले होते. या मोहिमेद्वारे ८,००० हून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचत त्यांनी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबवले आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासोबतच कलाविश्वातही इक्षुचे योगदान आहे. इक्षु यांनी सुमारे एका दशकापासून भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय आणि समकालीन नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. गुरु आदिती भागवत यांच्याकडे जयपुर घराणे शैलीच्या कथ्थक कलेचे तसेच सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक Ashley Lobo यांच्या मार्गदर्शनाखाली द डान्सवर्कस या संस्थेत बॅले, झॅज, हिप हॉपचे धडे घेतले आहेत. प्रोफेशनल डान्स सर्टिफिकेशन प्रोग्रॅम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी आपले नृत्य सादर केले आहेत. CID–UNESCO (United Nations International Dance Council) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या त्या सदस्य आहेत.

 गॅरीबे इन्स्टिट्यूटचे मानले आभार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरच्या वंशज असलेल्या आणि समाजकारणाचा वारसा लाभलेल्या इक्षू शिंदे यांनी हा सन्मान स्वीकारतांना गॅरीबे इन्स्टिट्यूटचे आभार मानले आणि त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. ‘इक्षु यांच्यात विश्लेषणात्मक विचार आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे प्रभावी मिश्रण आहे. नैतिक आणि बौद्धिक चौकट घडवणाऱ्या पुढील पिढीतील जागतिक नेतृत्वात त्या महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे संस्थेने इक्षु यांच्या निवडीविषयी बोलताना सांगितले.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?