AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Municipal Corporation Election 2025 : राज्यात महापालिका निवडणुका जाहीर, ओबीसींसाठी किती जागा?

आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 15 जानेवारी 2025 रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Municipal Corporation Election 2025 : राज्यात महापालिका निवडणुका जाहीर, ओबीसींसाठी किती जागा?
Election CommissionImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 15, 2025 | 5:20 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदमध्ये महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान  होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण 29 महापालिकांचा यामध्ये समावेश असून, एकूण 2869 जांगासाठी ही निवडणूक असणार आहे. आजपासून या महापालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार  23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी  उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार आहे, तर  15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे, त्यानुसार  2869 जांगासाठी ही निवडणूक होणार आहे. 2869 जागांपैकी 1 हजार 442 जागा या महिलांसाठी राखीव आहेत, तर 341 जागा या एससीसाठी राखीव असून,  एसटीसाठी 77  जागा राखीव आहेत. तर ओबीसींसाठी 759  जागा राखीव आहेत.

कोणत्या महापालिकांचा समावेश? 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर,  कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मिरा भाईंदर,  वसई विरार, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाडा, छत्रपती संभाजीनगर,  नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी महापालिकांची निवडणूक होणार आहे.

दरम्यान उमेदवरांना आपले उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहेत, तसेच ज्यांचं दुबार मतदान आहे, त्यांच्या नावापुढे स्टार करण्यात आलं आहे, अशा नागरिकांना केवळ एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येईल, असंही यावेळी निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...