युती-आघाडी करण्याची इच्छा, मग महायुती, मविआचं घोडं कुठं अडलं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra municipal election Update : महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. युती-आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. काही महानगर पालिकांच्या निवडणुकीत युती आणि आघाडीबाबत एकमत झाले आहे, तर काही ठिकाणी अद्याप बोलणी सुरू आहेत. याचा सविस्तर अहवाल जाणून घेऊयात.

युती-आघाडी करण्याची इच्छा, मग महायुती, मविआचं घोडं कुठं अडलं? वाचा स्पेशल रिपोर्ट
MVA vs Maha Yuti
Image Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 27, 2025 | 10:24 PM

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. युती-आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वच पक्षांचे नेते बैठकांमध्ये व्यस्त आहेत. काही महानगर पालिकांच्या निवडणुकीत युती आणि आघाडीबाबत एकमत झाले आहे, तर काही ठिकाणी अद्याप बोलणी सुरू आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी बोटावर मोजण्या इतके दिलस शिल्लक आहेत, त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील कोणत्या महानगर पालिकेत युती आणि आघाडीची काय स्थिती आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नागपूर मनपा

  • एकूण जागा – 151
  • महायुती – शिवसेनेची 15 जागांची मागणी, 2-3 जागा सोडणार, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार.
  • मविआ – काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाची बोलणी सुरु, निश्चित नाही

अमरावती मनपा

  • एकूण जागा – 87
  • महायुती – भाजप-शिंदे गटाची चर्चा सुरु, शिवसेनेनं 25 जागा मागितल्या, 12-15 पर्यंत जागा देणार, राणांच्या युवा स्वाभीमानची 12 जागांची मागणी, 6 जागा देणार. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार
  • मविआ – ठाकरे गट आणि मनसेची युती, शरद पवार गट आणि माकप युती, काँग्रेस आणि वंचित आघाडी स्वतंत्र लढणार.

अकोला मनपा

  • एकूण जागा – 80
  • महायुती- एनसीपी आणि भाजपची बैठक, तोडगा नाही, 15 जागा एनसीपीनं मागितल्या, या बैठकीनंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार
  • मविआ – महाविकास आघाडी होणार नाही, जिथे उमेदवार नाहीत तिथे काँग्रेस ठाकरे एकमेकांना मदत करणार.

चंद्रपूर मनपा

  • एकूण जागा- 66
  • महायुती – भाजप-शिवसेना युतीचं ठरलं, जागावाटप बाकी, शिवसेनेची 12 जागांची मागणी. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार.
  • मविआ – काँग्रेस आणि ठाकरे गटाची अद्याप चर्चा नाही, काँग्रेस स्वतंत्र लढण्याच्या तयारीत.

नाशिक मनपा

  • एकूण जागा – 122
  • महायुती – भाजप आणि शिवसेनेची चर्चा सुरु, शिवसेनेकडून 50 जागांची मागणी, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार.
  • मविआ – ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार गटाची चर्चा सुरु, अद्याप ठरलं नाही.

मालेगाव मनपा

  • एकूण जागा – 84
  • महायुती- गिरीश महाजनांच्या नेतृत्वात बैठका सुरु, शिंदे गटाची 16 जागांची मागणी, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार.
  • मविआ – काँग्रेस, उबाठा, मनसे, माकप आणि शरद पवार गटाची एकत्र बैठक, तोडगा नाही.

जळगाव मनपा

  • एकूण जागा – 75
  • महायुती – महायुतीची घोषणा, जागावाटप ठरलं नाही, शिंदे गटाची 25 जागांची मागणी, अजित पवार गटाकडून 12 जागांची मागणी.
  • मविआ – मविआचं अद्याप काही ठरलं नाही, 45 जागांवर काँग्रेसचा दावा

धुळे मनपा

  • एकूण जागा – 74
  • महायुती – पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक, शिवसेनेची 21 जागांची मागणी, प्रस्ताव मुंबईला पाठवला. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार.
  • मविआ – आघाडी झाली, उबाठा, काँग्रेस, मनसे आणि शरद पवार गट एकत्र. जागा वाटप लवकरच होणार.

अहिल्यानगर मनपा

  • एकूण जागा – 68
  • महायुती – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती चर्चा सुरु, 22+22+22 चा फॉर्म्युला
  • मविआ – काँग्रेस उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती, जागावाटप लवकरच.

संभाजीनगर मनपा

  • एकूण जागा – 115
  • महायुती – शिवसेना-भाजप चर्चा सुरु, शिवसेना 55, भाजप 45 चा फार्म्युला ? आजच याद्यी येण्याची शक्यता. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार.
  • मविआ – ठाकरे गट आणि मनसे एकत्र, काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत बोलणी सुरु, MIM स्वतंत्र लढणार.

जालना मनपा

  • एकूण जागा – 66
  • महायुती – जालन्यात महायुतीचं आज संध्याकाळी फायनल होणार.
  • मविआ – महायुतीचं जाहीर झाल्यानंतर मविआ जाहीर करणार युती, जागावाटप ठरलं नाही.

लातूर मनपा

  • एकूण जागा – 70
  • महायुती – भाजप आणि एनसीपीची बैठक झाली, NCP ची 35 जागांची मागणी, 20 जागा सोडण्यास भाजप तयार. एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार.
  • मविआ – ठाकरे गट आणि शरद पवार राष्ट्रवादीची युती, एकत्र निवडणूक लढणार, लवकरच जागावाटप. लातूरमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढणार.

नांदेड मनपा

  • एकूण जागा – 81
  • महायुती – भाजप आणि शिवसेनेची चर्चा सुरु, शिवसेनेनं 28 जागा मागितल्या, 14 द्यायला तयार. दोन्ही एनसीपी आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता.
  • मविआ – मविआत ठाकरे गट, वंचित आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढणार, लवकरच जागा वाटप होणार.

परभणी मनपा

  • एकूण जागा – 65
  • महायुती – अद्याप ठरलं नाही, शिंदे गटाची 35 जागांची मागणी, चर्चा सुरु. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार
  • मविआ – काँग्रेस आणि ठाकरे गटाची आघाडी, लवकरच जागावाटप होणार.