AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये चर्चेत आला कांदा घोटाळा, यादीसुद्धा व्हायरल… सीबीआय-ईडी चौकशी…

Nashik Onion: कांदा खरेदीत एकाच घरातील अनेक सदस्यांची नावे आहेत. ६ हजार ४१५ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केल्याचा तपशील यादीवरुन दिसत आहे. या यादीतील घोळावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिकमध्ये चर्चेत आला कांदा घोटाळा, यादीसुद्धा व्हायरल... सीबीआय-ईडी चौकशी...
onion viral list
| Updated on: Aug 19, 2024 | 2:21 PM
Share

नाशिक जिल्ह्यातील कांद्याने लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला झटका दिला. कांदा निर्यातीसंदर्भात घेतलेल्या धोरणामुळे लोकसभा निवडणुकीत एनडीएला फटका बसला. आता नाशिकमधील कांद्याचा घोटाळा समोर आला आहे. कांदा घोटाळ्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जूनमध्ये नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी केलेल्या पाहणीत देखील नाफेडच्या कांदा खरेदीत घोटाळा होत असल्याचे उघड झाले होते. नाफेडच्या कांदा खरेदीत घोटाळा होत असल्याचा समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

कांदा घोटाळा काय आहे?

नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तब्बल ६ हजार शेतकऱ्यांच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर समोर आली आहे. व्हायरल यादीमध्ये यावर्षीच्या १८ मे ते २० जुलै पर्यंतच्या कांदा खरेदीची माहिती दिली आहे. कांदा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा नोंदीपुढे शून्य आणि केवळ ७/१२ अशी नोंद असे दाखवले आहे. तसेच वजन केलेल्या ठिकाणी डमी अशी नोंद केली आहे.

एकाच घरातील सदस्यांची नावे

कांदा खरेदीत एकाच घरातील अनेक सदस्यांची नावे आहेत. ६ हजार ४१५ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केल्याचा तपशील यादीवरुन दिसत आहे. या यादीतील घोळावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नाफेडच्या कांदा खरेदीवर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घोटाळ्याचे आरोप होत आहे. आता व्हायरल यादीतून कांदा खरेदीतील मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शेतकरी संघटनेची सीबीआय चौकशीची मागणी

नाफेडमध्ये शेतकऱ्यांचा कांदा न घेता व्यापाऱ्यांचा कांदा घेतला गेला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी महासंघाचा कांदा घेतला गेला. त्याची यादी व्हायरल होत आहे, असा आरोप शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी ईडी अन् सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले. तसेच जोपर्यंत कांद्याला सहा हजार रुपये दर मिळत नाही, तोपर्यंत बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणू नये, असे सांगितले आहे.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.