चंदूचा मर्डर कर, मी तुला शय्यासुख देते, मित्राच्या प्रेयसीकडून सुपारी, बालमित्राची हत्या

बालमित्राच्या प्रेयसीने दिलेल्या शरीरसंबंधाच्या हव्यासामुळे भारतने आपला जवळचा मित्र चंदू महापूरची गळा चिरुन हत्या केली. (Nagpur Girlfriend Boyfriend's best friend murder)

चंदूचा मर्डर कर, मी तुला शय्यासुख देते, मित्राच्या प्रेयसीकडून सुपारी, बालमित्राची हत्या
आरोपी भारत आणि मयत चंदू महापूर

नागपूर : नागपुरातील चंदू महापूर हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘लव्ह, सेक्स आणि धोका’ असा पुरेपूर मसाला या हत्याकांडात भरलेला आहे. तीस वर्षीय चंदूचे ज्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, तिनेच चंदूच्या खास आणि बालपणीच्या मित्राला हत्येची सुपारी दिली होती. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे चंदूचा मित्र असलेला आरोपी भारत गुजर हा दीड लाख रुपये आणि मित्राच्या प्रेयसीकडून शरीरसुख मिळण्याच्या लालसेतून हत्येसाठी तयार झाला. (Nagpur Crime Girlfriend asks Boyfriend’s best friend to murder in exchange of sexual relations)

नेमकं काय घडलं?

आरोपी भारत गुजरने 25 फेब्रुवारीच्या दुपारी चंदू महापूरला दारु पार्टीसाठी नेले. संध्याकाळी भारत चंदूला सालईमेंढा गावाजवळ एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. बालमित्राच्या प्रेयसीने दिलेल्या शरीरसंबंधाच्या हव्यासामुळे त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली. तिथे भारतने आपला जवळचा मित्र चंदू महापूरची गळा चिरुन हत्या केली.

प्रेयसीच्या ठरलेल्या लग्नात चंदूचा खोडा

सालईमेंढा गावातील चंदू महापूर या तरुणाचे गावातील 21 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र जेव्हा तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवण्याच बेत आखले. तेव्हा तिचे लग्न होऊ नये, यासाठी चंदू आडकाठी करु लागला. यामुळेच नाराज असलेली त्याची प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी चंदूचा काटा काढण्याचा कट रचला.

कॅशवर भागेना, तेव्हा सेक्सची लालसा

चंदूचा खास मित्र भारत गुजरला प्रेयसीने हाताशी धरले. तरुणीच्या कुटुंबीयांनी भारतला दीड लाख रुपये रोख देण्याचे आमिष दिले. मात्र तो तेवढ्यावरून मित्राची हत्या करण्यास तयार नव्हता. त्यामुळे तरुणीने भारतला गाठलं. चंदूची हत्या केल्यास भविष्यात मी तुला शरीरसुख देईन, असे आश्वासन तिने दिले.

गळा चिरुन मृतदेह खाणीत फेकला

वासनेने अंध झालेल्या भारतने आपल्या मित्राची हत्या करण्यास होकार दिला. त्यानुसार 25 फेब्रुवारीला पार्टी देण्याच्या बहाण्याने भारतने आधी चंदूला भरपूर दारु पाजली. त्यानंतर नशेत असलेल्या चंदूला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याची गळा चिरुन हत्या केली. चंदूचा मृतदेह त्याने खाणीत फेकून दिला.

रात्री उशिरा चंदूचा मृतदेह गावाजवळ निर्जन ठिकाणी आढळल्याने एकाच खळबळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सुरुवातीला या हत्येविषयी कुठलाच उलगडा होत नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. (Nagpur Crime Girlfriend asks Boyfriend’s best friend to murder in exchange of sexual relations)

सीसीटीव्ही मित्र गप्पा मारताना कैद

भारतने 25 फेब्रुवारीला चंदूला ज्या बारमध्ये मद्य प्राशनासाठी नेले होते, तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे गप्पा मारताना कैद झाले होते. पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरु केला, भारत गुजरची चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

चंदूच्या प्रेयसीकडून शरीरसुखाचे आश्वासन मिळाल्यानंतर वासनेच्या भरात आपल्या मित्राला संपवल्याचा पश्चाताप भारतने पोलिसांकडे बोलून दाखवला. पोलिसांनी हत्येच्या या प्रकरणात भारत गुजर, चंदूची कथित प्रेयसी आणि तिच्या आई वडिलांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

रिक्षाचालकाची हत्या, कॉन्स्टेबल पत्नीला अटक, पत्नीच्या पोलीस प्रियकरालाही बेड्या!

लैंगिक संबंधांची मागणी धुडकावली, डोंबिवलीत दुकानदाराच्या पत्नीच्या हत्येचं गूढ उकललं

(Nagpur Crime Girlfriend asks Boyfriend’s best friend to murder in exchange of sexual relations)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI