AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते पुन्हा एकत्र येणार…! अखेर आशिष देशमुख यांना मार्ग मिळाला, पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरला

आशिष देशमुख यांना अखेर राजकीय मार्ग सापडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आशिष देशमुख यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर ते राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. पण काही कारणास्तव तसं घडू शकलं नाही.

ते पुन्हा एकत्र येणार...! अखेर आशिष देशमुख यांना मार्ग मिळाला, पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरला
| Updated on: Jun 14, 2023 | 9:48 PM
Share

नागपूर : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकांआधी भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत आमदारकीचा राजीनामा देणारे नेते आशिष देशमुख यांच्याबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आशिष देशमुख हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघातून निवडून आले होते. पण आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीका करत आमदारकी आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण आता पुन्हा पाच वर्षांनी ते भाजपात घरवापसी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आशिष देशमुख हे येत्या 18 जूनला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर ते आता भाजपात प्रवेश करणार आहेत. आशिष देशमुख हे भाजपच्या तिकीटावर काटोल किंवा सावनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

आशिष देशमुख यांचं काँग्रेसमधून निलंबन

आशिष देशमुख यांचं पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसमधून निलंबन झालं आहे. काँग्रेसमधून निलंबन झाल्यानंतर आशिष देशमुख यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर ते आता पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. देशमुख हे आधी भाजपातच होते. त्यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक ही भाजपच्या तिकीटावर लढवली होती. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

गेल्या पाच वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये आहेत. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्यादेखील होत्या चर्चा

विशेष म्हणजे आशिष देशमुख भाजपात प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यांनी पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची देखील माहिती समोर आली होती. पण त्यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.