अमरावतीत बर्ड फ्लू, संक्रमित फार्मवरील 29 हजार कोंबड्या नष्ट

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे थैमान असतांना आता बर्ड फ्लूचे देखील संकट ओढावले आहे (Bird Flu In Amravati).

अमरावतीत बर्ड फ्लू, संक्रमित फार्मवरील 29 हजार कोंबड्या नष्ट
Amravati Bird Flu

अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे थैमान असतांना आता बर्ड फ्लूचे देखील संकट ओढावले आहे (Bird Flu In Amravati). जिल्ह्यातील भानखेडा परिसरातील धीमान पोल्ट्री फार्मवरील कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला होता. त्यानंतर तब्बल 29 हजार कोंबड्या रद्द करण्यात आल्या होत्या (Bird Flu In Amravati).

धीमान पोल्ट्री या फार्मसह परिसरातील 29 हजार कोंबड्या खोल खड्डा करुन नष्ट करण्यात आल्या होत्या. मात्र, यात पोल्ट्री व्यावसायिकाचे तब्बल 50 लाखांचे नुकसान झाले आहे.

भानखेडा येथील सचिन गोळे यांच्या पोल्ट्री जवळ काही मृत पक्षी आढळले होते. त्यांचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्या पोल्ट्री फॉर्म वरील 29 हजार कोंबड्या आज आरोग्य विभागाने नष्ट केल्या आहेत. तर परिसरात तलाव असल्याने या ठिकाणी चायना, मंगोलिया आणि रशिया या देशातील पक्षी येत असल्याने येथे बर्ड फ्लूचा प्रसार झाला असावा, असा अंदाज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी व्यक्त केलाय.

आता या ठिकाणी 90 दिवस पक्षांच्या खरेदी-विक्री आणि पालनावर बंदी घालण्यात आली आहे. तर यात पोल्ट्री व्यावसायिक संदीप गोळे यांच मोठं नुकसान झाले आहे. त्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तर पोल्ट्री व्यवसायिकांनी घाबरुन न जाता तसेच लोकांनी सुद्धा अफवा पसरवू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

Bird Flu In Amravati

संबंधित बातम्या :

बाप रे! आता माणसांनाही बर्ड फ्लूची लागण; रशियात H5N8 स्ट्रेनची सात जणांना लागण

बर्ड फ्लू नियंत्रणासाठी सरकारकडून पक्षांची हत्या, मात्र नुकसान भरपाई 2009 च्या तोकड्या दराने

Bird Flu | राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक, नंदुरबारमध्ये आणखी 6 लाख कोंबड्यांची किलिंग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI