महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचा बंगाल पॅटर्नचा नारा, फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात बंगाल पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. (devendra fadnavis reaction on cm uddhav thackeray's bengal statements)

महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचा बंगाल पॅटर्नचा नारा, फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही!
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 9:45 AM

नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात बंगाल पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. आम्ही महाराष्ट्राचा कधीच बंगाल होऊ देणार नाही. काही झालं तरी होऊ देणार नाही. आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. कोलकाताची आजची व्यवस्था काय आहे हे माहीत आहे का? जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकावयाचं आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप जिवंत आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. काय वाटेले ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

संविधान बदलू देणार नाही

काल त्यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी काल संविधान बदलण्याचे मनसुबेच त्यांनी बोलून दाखवले. काही झालं तरी संविधान बदलू देणार नाही. कम्युनिस्टांना सोबत घेऊन संविधान बदलण्या मनसुबा रचला जात आहे. तो आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार

ईडीच्या कारवायावरूनही त्यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं. ईडी, सीबीआयबाबत मुख्यमंत्री बोलले. ती का येते? ती आम्ही नाही आणली. त्याचं कारण म्हणजे तुम्ही ज्या सरकारचं नेतृत्व करत आहात ते भ्रष्ट सरकार आहे. इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. खंडणी उकळणं हाच या सरकारचा अजेंडा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

तर तुमचे अर्धे मंत्री तुरुंगात असते

तपास यंत्रणांचा वापर करणं याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध आहे. मोदींनी कधीच तपास यंत्रणांचा गैरवापर केला नाही. जर त्यांनी गैरवापर केला असता तर तुमचे अर्धे मंत्री आज तुरुंगात दिसले असते, असा दावाही त्यांनी केला.

भाबडेपणाचा मुखवटा काढा

उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी ! अजित पवारांच्या नातेवाईकांकडे आयकर विभागाला धाडीत नेमके किती कोटी सापडले? पहिल्यांदाच आकडा जाहीर

VIDEO: मोठ्या भावाविरोधात ठाकरेंनी रणशिंग फुंकलं? दसऱ्याच्या भाषणात ड्रग्ज, अदानी, गांजा, निधीवर थेट मोदींना सवाल

VIDEO: सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली प्रकारच; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

(devendra fadnavis reaction on cm uddhav thackeray’s bengal statements)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.