Ganesh Chaturthi 2021 | नागपुरात मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्यास मनाई, नवे नियम कोणते ?

सूचनांनुसार बाप्पाच्या दर्शनासाठी मंडपात जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच गणरायाचे दर्शन घेण्याची सोय ऑनालईन पद्धतीने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे करुन द्यावी, असे सांगण्यात आले आहे. या संबंधीचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले आहेत.

Ganesh Chaturthi 2021 | नागपुरात मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्यास मनाई, नवे नियम कोणते ?
nagpur corona guidelines
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 8:03 PM

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट आणि रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन नागपूर जिल्हा प्रशासनाने गणोशोत्ससवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार बाप्पाच्या दर्शनासाठी मंडपात जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच गणरायाचे दर्शन घेण्याची सोय ऑनलईन पद्धतीने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे करुन द्यावी, असे सांगण्यात आले आहे. या संबंधीचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले आहेत. (ganesh chaturthi 2021 guidelines of nagpur district in marathi know all details)

मंडपात जाऊन दर्शन घेण्यास मज्जाव 

राज्यात काही भागांत रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच राज्यात तिसरी कोरोना लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन गणेशोत्सवादरम्यान भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सचे पालन करावे असेही सरकारने सांगितले आहे. त्यामुळे नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. यामध्ये प्रत्यक्ष मंडपात येऊन गणरायाचे दर्शन घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच दर्शनासाठी ऑनालाईन पद्धतीने सोय करुन द्यावी असे गणेश मंडळांना सांगितले आहे. तसेच यावेळी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव 2021 मार्गदर्शक सूचना

कोपिड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

1. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

2. कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतच्या धोरणानुसार मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

3. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मर्यादेत असावी.

4. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.

5. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

6. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिवीरे (उदा रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती करण्यात यावी.

7. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार  इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

8. आरती भजन कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

9. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केवल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

10 . गणपती निर्जंतुकीकरणाची तसेग वर्गल स्क्रीनिंगची पर्याप व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाच्या भाविकांसाठी शरीरिक फिजिकल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

11. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ याबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

12. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

13. कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे राज्य सरकारने आपल्या गाईडलानमध्ये सांगितले आहे.

इतर बातम्या :

प्रियकरासोबत वारंवार वाद, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मारहाण, विवाहितेचं टोकाचं पाऊल, पिंपरी चिंचवड हादरलं

T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती

आधी 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, आता अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पुण्यात नेमकं चाललंय काय?

(ganesh chaturthi 2021 guidelines of nagpur district in marathi know all details)

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.