AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heat wave : विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता

विदर्भात उष्णतेची लाट (Heat wave) आल्याचे पहायला मिळत आहे. नागपूरमध्ये (Nagpur) गेल्या 24 तासांमध्ये 42. 2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागपूरकर हैराण झाले आहेत.

Heat wave : विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता
राज्यात उष्णतेची लाट Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 25, 2022 | 8:26 AM
Share

नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट (Heat wave) आल्याचे पहायला मिळत आहे. नागपूरमध्ये (Nagpur) गेल्या 24 तासांमध्ये 42. 2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागपूरकर हैराण झाले आहेत. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असून, नागपूर जिल्ह्याचा पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो असा अंदाज नागपूर हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भातील (Vidarbha) जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. चंद्रपूरचे तापमान देखील 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्णता वाढत असल्याने नागरिक घरीच बसण्यास प्राधान्य देत असून, काही अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडताना दिसत आहेत. नागपूरप्रमाणेच मराठवाड्यात देखील सुर्य आग ओकत आहे. मराठवाड्याच्या तापमाना देखील मोठी वाढ झाली आहे. एकीकडे राज्यातील तापमान वाढत आहे, तर दुसरीकडे काही भागात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पाऊस

गेल्या दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील काही भागांंमध्ये चांगलाच पाऊस झाला. वादळीवाऱ्यासह गारपीट झाल्याचे पहायला मिळाले. गारपीटीमुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, तर काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या, पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने, काही काळ नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पिकांना मात्र मोठा फटका बसला.

अवकाळीचा पिकांना फटका

राज्याच्या  अनेक भागात विषेता: सांगली आणि नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस अवकाळी पाऊस झाला. या पवासाचा मोठा फटका हा पिकांसह फळबागांना बसला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पाऊस आणि झालेल्या गारपीटीमुळे आंब्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून, फळ गळती झाली आहे. गारपीटीमुळे उन्हाळी बाजरी, ज्वारी तसेच कांद्याचे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अवकाळी मुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.

संबंधित बातम्या

Sugarcane : उसाची तोड झाली, मग खोडव्याचे व्यवस्थापन करा अन् उत्पादन वाढवा

Cotton : कापसाचे उत्पादन घ्या, पण फरदडमुळे होणारे नुकसान टाळा, ‘फरदड मुक्त गाव’ मोहिमेत कृषी विभाग बांधावर

Thane: माणुसकी जिवंत आहे, हे सिद्ध करणारी घटना! गरोदर असलेल्या जखमी गाईचं संवेदनशील कुटुंबाकडून बाळंतपण

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?