Nagpur Corona | मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित; जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली कोरोना पायबंदासाठी प्रेरणा

Nagpur Corona | मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित; जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली कोरोना पायबंदासाठी प्रेरणा
नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर.

मी सुरक्षित, माझं नागपूर सुरक्षित असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरच्या जनतेस केले होते. त्या आवाहनास जनतेचा सक्रिय सहभाग लाभला. माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मुख्यमंत्र्यांच्या हाकेला सुद्धा जनतेने साद दिली, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 21, 2022 | 6:21 AM

नागपूर : मी सुरक्षित, माझे नागपूर सुरक्षित या प्रेरणेतून प्रत्येकाने या कोरोना साथीला तोंड दिल्यास आम्ही सर्व या संकटातून बाहेर पडू. जगाच्या इतिहासात साथ रोगातून बाहेर पाडण्यासाठी लसीकरण, विलगीकरण आणि जागरूकता ही त्रिसूत्री कामी आली आहे. त्याचाच वापर आपण करूया, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र, महा – आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त वेबवार्ता चर्चा संवादात त्या गुरुवारी बोलत होत्या. कोरोनाच्या दोन लाटा नागपूर जिल्ह्याने आव्हान म्हणून स्वीकारल्या. उपलब्ध संसाधनांचा उपयुक्त वापर करत या कठीण काळात संघर्ष आजही सुरु आहे. प्रशासनाने दरम्यानच्या काळात भक्कम आधारभूत सुविधा निर्माण केल्या आणि आज प्रशासन सज्जतेच्या बाबतीत नागपूर स्वयंपूर्ण आहे. असे असले तरीही, तिसऱ्या लाटेची सौम्यता नागरिक फार सहजतेने घेत आहेत ही चिंता वाढवणारी बाब आहे.

सावध राहणे, काळजी घेणे हेच आपल्या हातात

साथरोग व स्वास्थ्याविषयक संकटांना जुना इतिहास आहे. रोगांच्या साथी येत राहिल्या, शास्त्रज्ञ चिकाटीने त्यावर उपाय काढीत आले. त्या त्या काळी शासन प्रशासन संकटांना तोंड देत आले. परंतु जनजागृती आणि लोकसहभाग हेच नेहमी प्रथम आयुध राहिले. सावध राहणे, स्वतःची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. एक नागरिक म्हणून सुद्धा ती आपल्या सर्वांची पहिली जबाबदारी आहे, याची जाण जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात करून दिली. कोरोनाच्या दोन लाटांमध्ये आपण सर्वांनी आप्तस्वकियांचे दुःख पाहिलेत. अनेकांनी प्रियजन गमावले, अनेकांना आजारपण भोगावे लागले, अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न आला आणि मानसिक ताण व अनिश्चिततेच्या वातारणाचा कंटाळातर आपण सर्वांनीच भोगला. आता हा गुंता संपवायचा आहे. लोकांकडून असेच सहकार्य राहिले तर हे संकट फार थोड्या दिवसांचे राहिले आहे, अशा भावना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मांडल्या.

राज्यात सर्वाधिक ऑक्सिजन साठवणूक क्षमता नागपूरची

राज्यात सर्वाधिक ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता नागपूरची आहे. मोठ्या प्रमाणात बेड्सची उपलब्धता आहे. तालुकानिहाय कोविड कंट्रोल रूम्स आहेत. आतापर्यंत सर्व उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य वापर करण्यात जिल्हा प्रशासनास यश मिळाले. सर्व हॉस्पिटल्सचीही वाखाणण्याजोगी साथ मिळत राहिली. जिल्हाधिकारी म्हणाल्या की, तज्ज्ञांनी ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर डबल मास्क घालण्याची सूचना दिलेली आहे. नागरिक कोरोनाची चाचणी सेल्फ टेस्ट किटने करतात. पण टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास कोविड कंट्रोल रूमला कळवत नाहीत. कोरोनाच्या दोन लाटांना तोंड दिल्यानंतर स्वाभाविकतः सर्वांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम झाला आहे. विशेषतः मधुमेह, उच्चरक्तदाब अशा को-मॉर्बिडिटीज असलेल्या लोकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. दुर्दैवाने हवी तशी सक्रिय सतर्कता सध्या जनमानसात दिसत नाहीये. देशाच्या इतर अनेक भागांपेक्षा नागपूर जिल्ह्याची सद्यस्थिती फारच उजवी आहे. सार्वजनिक ठिकाणी व घरीही नागरिकांच्या छोट्या छोट्या चुकांमुळे हे चित्र पालटू नये यासाठी प्रशासन चौकस आहे, असे जिल्हाधिकारी आर. विमला म्हणाल्या.

NMC Election | नागपूर भाजपात कोण करतंय गुलाम बनविण्याचा प्रयत्न; अविनाश ठाकरे यांच्या पोस्टने खळबळ, पोस्ट नेमकी काय?

Gondia ZP Election | प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; काँग्रेसच्या नाना पटोले यांनाही धक्का!

Bhandara ZP Election | भंडाऱ्यात 21 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेच्या समीकरणासाठी काय करावं लागणार?

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें