नागपुरात कोंबड्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; सजावट, औक्षण अन् गोडधोड जेवणाच्या पंगती!

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील कागदेलवार कुटुंबाने 'कुचा' नावाच्या हा कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय. 'कुचा' नावाचा हा कोंबडा कागदेलवार कुटुंबात सर्वांचा लाडका आहे. 20 सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला.

नागपुरात कोंबड्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; सजावट, औक्षण अन् गोडधोड जेवणाच्या पंगती!
नागपुरात कोंबड्याचा वाढदिवस साजरा

नागपूर : कोण काय करेल, याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये जेसीबीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुणी कुत्र्याचा, मांजरीचा तर कुणी बैलाचा वाढदिवस साजरा केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, आता नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील मंगळवारी पेठेतील कागदेलवर कुटुंबीयांनी चक्क कोंबड्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.

कुटुंबातल्या लाडक्या कोंबड्याचा वाढदिवस

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील कागदेलवार कुटुंबाने ‘कुचा’ नावाच्या हा कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय. ‘कुचा’ नावाचा हा कोंबडा कागदेलवार कुटुंबात सर्वांचा लाडका आहे. 20 सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशियल मीडियावर वायरल होतेय.

सजावट, औक्षण, गोडधोड जेवण, वाढदिवसाचं जोरात सेलिब्रेशन

उमरेडच्या मंगळवारी पेठेत कुचा कोंबडा कागदेलवार कुटुंबियांसोबत राहतो. नुकतंच कागदेलवार कुटुंबात राहताना त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी कुचाची मालकीण असलेल्या सुरभी कागदेलवार यांनी खास सजावट केली होती. या वेळी कुचाचे औक्षण करून गोडधोड खाऊ घातले आणि वाढदिवस साजरा केला.

नागपुरात पोलिस अधिकाऱ्याकडून कुत्रीचं डोहाळे जेवण

नव्या पाहुण्याची चाहूल लागताच ‘कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण केले जाते. मात्र, जर हेच डोहाळे जेवण एखाद्या श्वानाचे असेल तर.. नागपुरात काही दिवसांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने आपल्या लाडाच्या श्वानाचे मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला.

पोलिस अधिकाऱ्याने चक्क घरी पाळलेल्या श्वानाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी शेजारी आणि नातेवाईकांना बोलावण्यात आले. विन्नीला सजवून पाळण्यात बसवले आणि केक कापून आनंदोत्सव साजरा केला. प्राण्यांप्रती प्रेम आणि आपुलकी व्यक्त केल्याबद्दल अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

अरुण बकाल हे नागपूर शहर पोलिस दलात आहेत. सध्या ते शांतीनगर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ‘ॲनिमल लव्हर’ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मित्राने गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी त्यांना लॅब्रा प्रजातीचे एक कुत्र्याचे पिल्लू गिफ्ट केले होते. त्यांनी त्याचे नाव ‘विन्नी’ ठेवले. महिन्याभरात विन्नी ही बकाल कुटुंबातील सदस्य बनली.

पोलिस अधिकारी बकाल यांची पत्नी आरती आणि मुलगा अनिष यांनी विन्नीला भरपूर प्रेम दिले. गेल्या दोन वर्षांपासून विन्नीचा मुलीप्रमाणेच वाढदिवस साजरा करण्यात येतो. गेल्या दीड महिण्यांपूर्वी विन्नीला डॉ. राऊत यांच्या दवाखाण्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी विन्नी प्रेग्नंट असल्याचे सांगितले. विन्नी आता ‘गुड न्यूज’ देणार म्हणून बकाल कुटुंबीयांनी तिची मुलीप्रमाणे काळजी घेतली.

विन्नीचे खाणे-पीणे तसेच वारंवार डॉक्टरांकडे नेण्यात येत होते. येत्या काही दिवसांतच तिची प्रसुती होणार आहे. त्यामुळे तिच्या डोहाळे जेवनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना त्यांना सूचली. विशेष म्हणजे, डोहाळ जेवण कार्यक्रमासाठी झोका, धनुष्यबाण, फुलांची सजावट आणि पारंपारिक गाणी लावण्यात आली होती. त्यासाठी वैष्णवी आणि स्नेहा यांनी सर्व सजावट केली.

एवढंच नव्हे तर, गर्भवती महिलेला डोहाळ जेवणाला ज्याप्रमाणे हिरवी साडी-चोळी घेतली जाते, त्याचप्रमाणे विन्नीलाही खास शिवलेला हिरवा ड्रेस घालून हेअरस्टाईल करून नटवण्यात आले होते. तर परिसरातील महिलांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी महिलांनी विन्नीचे औक्षण करून ओटीही भरली. सध्या या डोहाळजेवणाची नागपुरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

(kagdelwar Family Celebrate hens birthday in Maharashtra Nagpur News Video Goes Viral On Social Media)

हे ही वाचा :

नारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा?

Happy Birthday Prem Chopra | ‘खलनायक’ बनून तब्बल 60 वर्ष मनोरंजन विश्वावर राज्य करणारे अभिनेते प्रेम चोप्रा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI