AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election Ward No 20 | प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेसने उघडले होते खाते, यंदा भाजप बालेकिल्ला राखणार की पुन्हा सुरुंग लागणार?

NMC Election Ward No 20 | नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले होते. तर एका जागेवर काँग्रेसने बाजी मारली होती.

NMC Election Ward No 20 |  प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेसने उघडले होते खाते, यंदा भाजप बालेकिल्ला राखणार की पुन्हा सुरुंग लागणार?
काँग्रेस देणार पुन्हा धक्का?Image Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 06, 2022 | 7:05 PM
Share

नागपूर | राज्यातील महापालिका निवडणुकीचा (Municipal election) बिगुल वाजला आहे. कोरोनानंतर आणि राज्यातील सध्याच्या सत्ता संघर्षानंतर स्थानिक पातळीवर ही बरीच समीकरणं (local level equation) बदलली आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातही पालिका निवडणुकीची दोन वर्षांपासून गोळाबेरीज सुरु आहे. राज्यातील सत्तांतरणाचे बिन्निचे शिलेदार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर बारीक लक्ष आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वातील या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीची रचना, आरक्षण हे मुद्दे पालिका निवडणुकीचे राजकारण तापवल्याशिवाय राहणार नाहीत. नागपूर पालिकेच्या (NMC Election 2022) प्रभाग क्रमांक 20 मध्ये 2022 च्या रचनेप्रमाणे एकूण तीन वॉर्ड येतात. याआधी प्रभाग क्रमांक मध्ये चार वॉर्ड होते. आता नव्या रचनेप्रमाणेत या प्रभागामधील कोणता वॉर्ड आरक्षित झाला आहे? कुणासाठी आरक्षित झाला आहे? हे पाहुयात

यावेळी काय होईल?

संघ मुख्यालय असलेल्या नागपुरातील भाजपचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी भाजपने (BJP) प्रयत्न चालविले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 108 तर काँग्रसचे 29 नगरसेवक निवडून आले होते. सेना पार चौथ्या स्थानावर होती. आता पालिकेत ऑपेरशन कमळ साठी भाजपतील स्थानिक नेतृत्व सक्रीय झाले आहे. दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांवर (Congress Candidate) भाजपचा डोळा आहे. ज्यांचे स्थानिक नेटवर्क तगडे आहे, अशा विरोधी गटातील उमेदवारांना भाजपच्या गोटात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे प्रभार रचनेतील बदलासह उमेदवार बदलाचा ही धक्का काही प्रभागात बसू शकतो. प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला असला तर काँग्रेसने एका जागेवर सुरुंग लावला होता.

2017 साली नागपूर महानगर पालिकेमध्ये भाजपने आपलं निर्विवाद वर्चस्व राखलं होतं. संख्याबळावर महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपनंतर पालिकेच्या रिंगणात काँग्रेस,मग बीएसपी आणि सगळ्यात शेवटी शिवसेनेने पालिकेत स्थान मिळवले होते.

नागपूर महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 20 प्रभाग क्रमांक 20 मध्ये नेमके किती वॉर्ड? : 3

लोकसंख्येचे गणित काय?

एकूण लोकसंख्या : 49388 अनुसूचीत जाती : 10924 अनुसूचीत जमाती : 4406

प्रभागात कोणता परिसर?

के. टी. नगर, गिट्टीखदान, आर. बी. आय. कॉलनी, सेमीनरी हिल्स, वैष्णव कॉलनी, तेलंगखेडी, भारतनगर ,रवीनगर, कोलपूरा ब्लॉक क्रं. 18, डब्ल्यु. सी. एल. कॉलनी, सेंट्रल एक्साईज कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी, सी. पी. डब्ल्यू. डी. कॉलनी, फ्रेन्डस कॉलनी, जागृती कॉलनी, सुरेंद्रगड, देशराजनगर, वेनुका वासीम कॉलनी, इन्कम टॅक्स कॉलनी

प्रभाग क्रमांक एकमधील आरक्षण पुढीलप्रमाणे :

प्रभाग क्रमांक 20 अ : अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 20 ब : अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक 20 क : सर्वसाधारण

2017 साली कोण जिंकलं होतं?

2017 साली प्रभाग क्रमांक 20 मध्ये एकूण चार वॉर्ड होते. त्यात बदल होऊन आता फक्त तीनच वॉर्ड आहेत. त्यामुळे एका नगरसेवकाची गच्छंती निश्चित आहे. त्यातच पक्ष काय धोरण ठरवतो. नवीन लोकसंख्येमुळे होणारे बदल, वॉर्ड रचनेचा परिणाम या सर्वांचा सत्ता समीकरणावर होणार आहे. दरम्यान, 2017 साली प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी बाजी मारली होती. परंतू या प्रभागात काँग्रेसने एका जागेवर सुरुंग लावला होता.

2017 साली निवडून आलेल्या विजयी उमेदवारांची नावे

प्रभाग क्रमांक 20 अ : शंकुतला पारवे, भाजप, मतं 9245 प्रभाग क्रमांक 20 ब : यशश्री देवराम नंदनवार, भाजप, मतं 11191 प्रभाग क्रमांक 20 क : रमेश गणपती पुणेकर, काँग्रेस, मतं 10110 प्रभाग क्रमांक 20 ड : दिपराज पर्डीकर, भाजप, मतं 5923

पक्षउमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्ष
पक्षउमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्ष
पक्षउमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्ष

Follow Us
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर