AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतच्या वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

NCP Leader Jitendra Awhad on Statement About Dr Babasaheb Ambedkar : मंदिरात घेऊन जाणे,बाहेर येऊन प्रतिक्रिया देणे हे जमत नाही, देव आणि धर्म हा व्यक्तिगत विषय आहे महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याने रामटेक ला यायला पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. आंबेडकरांबाबतच्या विधानावरही आव्हाडांचं स्पष्टीकरण...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतच्या वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
| Updated on: Jan 17, 2024 | 2:17 PM
Share

सुनिल ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 17 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, त्यांची वक्तव्य आणि वाद… हे मागच्या काही दिवसातलं समीकरण झालं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभूरामांबाबत केलेलं वक्तव्य ताजं असतानाच त्यांनी पुन्हा एकदा नवं वक्तव्य केलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आव्हाडांनी वक्तव्य केलं. न्यायव्यनस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला. न्यायपालिका सध्या निष्पक्ष राहिलेली नाही. अनेक निर्णयांमधून जातीव्यवस्थेचा वास येतो, असं आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने वाद झाला. या वक्तव्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आव्हाडांचं स्पष्टीकरण

मी काल तो विषय मांडला आणि तिथेच संपवला. मी माझी शंका उपस्थित केली. बाबासाहेबांनी काय केले काय नाही. माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हणत नाही. न्यायालयात जातीचा वास येतो असं मी म्हणालो नाही. माझ्या आईला कोणीही पूजेला बोलवत नव्हतं. चातुर्वर्ण्य समजत गेलो. तेव्हा समजलं की आईला पूजेला का बोलवत नाहीत. बाबासाहेबांनी आरक्षण म्हणजे आर्थिक उन्नतीचं साधन ठेवलं नव्हतं. ज्यांना शिक्षण, घर नाही त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण आहे, असं आव्हाड म्हणाले.

प्रभूरामांबाबत आव्हाडांचं विधान

माझा प्रश्न एवढंच आहे की माझ्यावर ज्या प्रमाणे शिव्या देण्यात येतात,मी साधा प्रश्न विचारला की राम क्षत्रिय होते? राम आमचाच म्हणतो,प्रत्येकाच्या मनात आदराची कल्पना आहे, विपरीत परिस्थितीत लढणारा राम, लंका देणारा राम… विपरीत परिस्थितीत चूप बसणं योग्य असतं. वैचारिक लढाई लढायची नसते,विचार मांडला की आई बहिणीच्या शिव्या मिळतात. ना बोलण्याचे परिणाम भारताला भोगावे लागतील. देश महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारावर बोलत नाही. देशात अबोला झाला आहे. आपले पूर्वज इंग्रजांशी का भांडले तेच कळत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

अयोध्येला कधी जाणार?

आम्ही 22 तारखेला अयोध्येला जाणार नाही. 23 ला जाणार नाहीय तर 24 ला दर्शन घेणार आहोत. निमंत्रण कशाला पाहिजे? आम्हाला जेव्हा जायचे तेव्हा जाणार. द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण का दिल नाही?, असंही आव्हाड म्हणाले.

शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले तेंव्हा त्याचे उत्तर काय द्यावे. आज जो हिंदू धर्म दिसत आहे. ते शंकराचार्य मुळे. असं असेल तर तुम्हाला हिंदू धर्म माहीत नाही. आम्ही वैचारिक संघर्ष करायला तयार आहे . 22 जानेवारी काही पूजा पाठ करण्याचा दिवस नाही. अनेक वर्षांपासून रामाच्या नावावर निवडणूक लढली जात आहे, असं आव्हाड म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.