नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा 25 नोव्हेंबरपासून, परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या बैठकीत निर्णय

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 21, 2021 | 12:49 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने शनिवारी झालेल्या बैठकीनंतर परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार, परीक्षेबाबत महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली.

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा 25 नोव्हेंबरपासून, परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या बैठकीत निर्णय
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर

Follow us on

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची शनिवारी तातडीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा येत्या 25 नोव्हेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने शनिवारी झालेल्या बैठकीनंतर परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार, परीक्षेबाबत महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली.

लेखी परीक्षा 11 डिसेंबरपर्यंत

परिपत्रकानुसार, महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेताना त्या ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाव्या असे नमूद आहे. पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या 2, 4, 6, 8 व 10 व्या सेमिस्टरमधील अनुत्तीर्ण व बहि:शाल विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत होतील. याच सत्राच्या लेखी परीक्षा महाविद्यालय स्तरावर 1 ते 11 डिसेंबरपर्यंत महाविद्यालय स्तरावर घेतल्या जाणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालय स्तरावर

पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या 3, 5, 7 व 9 या सेमिस्टरमधील नियमित, अनुत्तीर्ण, माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्वीप्रमाणेच महाविद्यालय स्तरावर होतील. लेखी परीक्षा विद्यापीठ स्तरावर 14 डिसेंबरपासून 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं वेळापत्रकानुसार होणार आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील 2 व 3 वर्षीय अभ्यासक्रमाच्या 3 व 5 व्या सेमिस्टरच्या प्रात्यक्षिक परीक्षा 10 ते 15 जानेवारी दरम्यान ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. याच अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाईन पद्धतीनं 17 ते 29 जानेवारीपर्यंत होतील, असे परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राध्यापकांची १८२ पदे रिक्त

नागपूर विद्यापीठातील मासागवर्गीय शिक्षकांचा अनुशेष अद्याप भरलेला नाही. विद्यापीठात ३५० पदे मंजूर आहेत. त्यापैकी १८२ पदे अद्याप रिक्त आहेत. फक्त प्राध्यापकांचीच ही अवस्था नाही, तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचीही अशीच अवस्था आहे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ५५५ पदे मंजूर आहेत. यापैकी ३८८ पदे भरण्यात आली आहेत. तर १६७ पदे अजूनही रिक्त आहेत.

विद्यापीठाने अनुशेष भरावा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचा अनुशेष तातडीनं भरावा, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केली आहे. या अनुशेषाबद्दल कास्ट्राईब कर्मचारी महासंघानं नुकतीच कुलगुरुंशी बैठक घेऊन चर्चा केली. अनुशेष न भरणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी विनंती कुलगुरुंना केल्याचं इंगळे यांनी सांगितलं.

नागपुरात भाजप काँग्रेसचं OBC कार्ड, विधानपरिषदेला बावनकुळेंविरोधात ओबीसी उमेदवार?

चाकूच्या धाकाने लुटले पावणेदोन कोटी, 15 तासांत पोलिसांनी केले जेरबंद

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI