नागपूर विद्यापीठाचा 9,429 विद्यार्थ्यांना दणका, समाधानकारक कारणं न दिल्याने पुनर्परीक्षेची विनंती फेटाळली

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 9 हजार 439 विद्यार्थ्यांना दणका दिला आहे. विद्यापीठाने पुन्हा ॲानलाईन परिक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी फेटाळून लावली आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी परिक्षेत नागपूर विद्यापीठातील तब्बल 9 हजार 429 विद्यार्थी नापास होणार आहेत | Nagpur University

नागपूर विद्यापीठाचा 9,429 विद्यार्थ्यांना दणका, समाधानकारक कारणं न दिल्याने पुनर्परीक्षेची विनंती फेटाळली
Nagpur-University

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 9 हजार 439 विद्यार्थ्यांना दणका दिला आहे. विद्यापीठाने पुन्हा ॲानलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी फेटाळून लावली आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी परीक्षेत नागपूर विद्यापीठातील तब्बल 9 हजार 429 विद्यार्थी नापास होणार आहेत (Nagpur University Rejected The Re-Examination Request As It Did Not Gave Satisfactory Reasons).

कोरोनामुळे नागपूर विद्यापीठाने सर्व परीक्षा ॲानलाईन घेण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार, हिवाळी परीक्षेत काही तांत्रिक अडचणी किंवा महत्त्वाच्या कारणास्तव परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ पुर्नपरीक्षा घेते. पण पुर्नपरीक्षेची मागणी करताना समाधानकारक कारणं न दिलेल्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना पुरेसा वेळ मिळून परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी नागपूर विद्यापीठाने फेटाळून लावली आहे.

त्यामुळे हिवाळी परीक्षेत पुर्नपरीक्षेची मागणी फेटाळल्याने 9 हजार 429 विद्यार्थ्यांनी फेल होणार आहे. पहिल्या फेजमध्ये 3 हजार 895 तर दुसऱ्या फेजमध्ये 5 हजार 534 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी अमान्य केली आहे, असं नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रफुल्ल साबळे यांनी सांगितलं.

ऑनलाईन परीक्षेत कॉपी कशी करायची, याचे धडे देणारे व्हिडीओ व्हायरल

कोरोनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची सध्या ॲानलाईन परीक्षा सुरु आहेत. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नागपूर विद्यापीठाच्या ॲानलाईन परीक्षेत चिटिंग कशी करायची? याचे धडे देणारे व्हिडीओ सध्या सर्रास सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा फैसला करणाऱ्या, नागपूर विद्यापीठाच्या ॲानलाईन परीक्षा खरंच पारदर्शक आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होतोय.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये नेमकं काय?

सोशल मीडियावर सध्या नागपूर विद्यापीठाच्या ॲानलाईन परीक्षेत कॅापी करण्याचे धडे देणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ॲानलाईन परीक्षा सुरु असताना प्रश्नांची उत्तरं गुगलवर कशी शोधायची, परीक्षेत चिटिंग करताना संगणकाच्या कॅमेऱ्यापासून बचाव कसा करायचा? हा गैरप्रकार करताना तुम्ही पकडले जाणार नाही, याचे काय फंडे आहेत. विद्यापीठाच्या ॲानलाईन परीक्षेत कॅापी करण्याचे धडे देणारे अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ सर्रास व्हायरल होत आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे अशा लिंक 11 हजार लोकांना बघितल्या आहेत. याबबात विद्यापीठ सायबर पोलिसांत तक्रार करणार असल्याचं परीक्षा नियंत्रक सांगतात.

Nagpur University Rejected The Re-Examination Request As It Did Not Gave Satisfactory Reasons

सबंधित बातम्या :

नागपूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी डॉ. संजय दुधे यांची नियुक्ती

अंतिम वर्षातील परीक्षांना ग्रहण, नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, परीक्षा पुढे ढकलल्या