लेकीला उमेदवारी न दिल्याने विजय वडेट्टीवार नाराज?; म्हणाले, दिल्लीला हादरे…

Vijay Wadettiwar on Congress Chandrapur Loksabha Election 2024 : शिवानी वडेट्टीवार यांना काँग्रेसने तिकीट नाकारलं; विजय वडेट्टीवार यांचं मत काय? नाराजीच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले? लोकसभा निवडणुकीवर वडेट्टीवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

लेकीला उमेदवारी न दिल्याने विजय वडेट्टीवार नाराज?; म्हणाले, दिल्लीला हादरे...
Follow us
| Updated on: Mar 25, 2024 | 1:48 PM

प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यापैकी कुणाला तिकीट मिळणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. याचं उत्तर अखेर मिळालं आहे. काल संध्याकाळी काँग्रेसने लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार असतील. प्रतिभा या दिवंगत काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा होते आहे.

धानोरकर यांच्या उमेदवारीवर वडेट्टीवार म्हणाले…

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रपूरच्या उमेदवारीवरही भाष्य केलं आहे. पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य आहे. शिवानीने उमेदवारी मागितली होती. पण ती दिली गेली नाही. मला शक्य असेल तिथे प्रचारासाठी जाईल. मी काँग्रेसचा नेता आहे. मला महाराष्ट्रभर काम करायचं संकटाच्या वेळेस महाराष्ट्र उभा राहिला आहे.दिल्लीच्या हादरे देण्याची हिंमत आणि शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

प्रतिभा धानोरकर गडबडी मध्ये माझं नाव विसरले असतील. नावामुळे फार काही फरक पडत नाही नाव घेतलं पाहिजे असं काही नाही. पाचही ठिकाणी माझा वाटा असतो. जिथे जिथे माझी गरज असेल तिथे तिथे मी जाईल, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

विरोधकांना टोला

काही लोकांना सत्तेमुळे शहाणपण सुचलाय. तो उशिरा सुचतो. लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडल्याबरोबर त्याला काँग्रेसची हुकूमशाही दिसते. तर मला असं वाटतं की घोडा पुढे दौडत असताना घोड्याचा आवाज गाढव काढतोय आणि स्वतःला घोडा समजतो आहे असं तो प्रकार दिसतोय, असं म्हणत वडेट्टीवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

काँग्रेस जिंकणारच- वडेट्टीवार

पुरोगामी विचाराला घेऊन चालणारा विदर्भ हा कायम काँग्रेस सोबत राहिलेला आहे. संकटाच्या वेळेस सुद्धा काँग्रेसला विदर्भातील प्रचंड अशी साथ दिली आहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही लढती काँग्रेससाठी अनुकूल आहेत. चारही ठिकाणी भाजप बरोबर लढत आहे.विदर्भातील पूर्व जनतेने मनात ठरवलेला आहे,यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.