कोंबडीमागे पळताना दुर्घटना, चिमुकल्या बहीण-भावाचा नाल्यात बुडून मृत्यू

नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील आमगाव-देवळी येथील लहान बहिण-भावाचा एका नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

  • Updated On - 4:32 pm, Mon, 14 June 21 Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
कोंबडीमागे पळताना दुर्घटना, चिमुकल्या बहीण-भावाचा नाल्यात बुडून मृत्यू

नागपूर : जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील आमगाव-देवळी येथील लहान बहिण-भावाचा एका नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरुषी नामदेव राऊत (10) आणि अभिषेक नामदेव राऊत (7) अशी मृतकांची नाव आहेत. (Nagpur younger sister and brother drowned in Nala)

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत आमगाव-देवळी हे गाव आहे. गावातील रहिवासी नामदेव राऊत यांची दोन्ही मुलं कालपासून बेपत्ता होती. यासंदर्भात हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नामदेव राऊत यांनी गावातील नागरिकांसोबत आज सकाळपासूनच गाव आणि शिवारात मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांचे कपडे आणि चप्पल नाल्याच्या शेजारी दिसून आले. त्यानंतर या संदर्भात हिंगणा पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली.

माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने नाल्यात शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हादोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. नामदेव राऊत हे शेतमजूर असून त्यांनी आल्या दोन्ही मुलांना गमावल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अभिषेक आणि आरुषी या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

गावातील लोकांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार अभिषेक आणि आरुषी हे दोघेही कोंबडीच्या मागे पळत असताना नाल्या शेजारी गेले असावेत. तेव्हा त्या ठिकाणी मासोळ्या दिसून आल्याने त्या पकडण्यासाठी दोन्ही मुलं पाण्यात उतरली. त्याचदरम्यान मासोळ्या पकडण्याच्या नादात दोन्ही मुलं बुडाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत पोलिसांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही.

इतर बातम्या

वेतनास विलंब होत असल्यामुळे संताप, नागपूरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

बायको नसताना फेसबुक फ्रेण्डला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला

मद्यधुंद रुग्णासह चौघांचे महिला-पुरुष डॉक्टरांशी असभ्य वर्तन, केबिनची तोडफोड

(Nagpur younger sister and brother drowned in Nala)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI