Gondia-Bhandara जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी २१ डिसेंबरला मतदान, दोन्ही जिल्ह्यांत आजपासून आचारसंहिता लागू

संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

Gondia-Bhandara जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी २१ डिसेंबरला मतदान, दोन्ही जिल्ह्यांत आजपासून आचारसंहिता लागू
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 5:37 PM

नागपूर : राज्य निवडणूक विभागानं गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीची घोषणा केली. या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदार 21 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. 22 डिसेंबरला मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर रोजी सुट्टी असल्यानं नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबरला होईल. मतदान 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. अशी अधिसूचना आज जारी करण्यात आली.

भंडाऱ्यात सात, तर गोंदियात आठ पंचायत समिती

भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 क्षेत्रांत आणि त्याअंतर्गतच्या 7 पंचायत समित्यांच्या 104 क्षेत्रांत ही निवडणूक होणार आहे. तर, गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 क्षेत्रात आणि त्याअंतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या 106 जागांच्या सार्वत्रिक निवडणुक्कांसाठी मतदान होणार आहे. भंडारा जिल्हा परिषद आणि तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूर या पंचायत समिती क्षेत्रांत निवडणूक होणार आहे. गोंदिया जिल्हा परिषद आणि गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडकअर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी या पंचायत समितींमध्ये निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

प्रफुल्ल पटेल, नाना पटोले यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक

या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीचे हेविवेट नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचे नेतृत्व आहे. त्यामुळं दोघांसाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. नाना पटोले यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जिल्हा परिषद क्षेत्रामधूनच केली होती.

राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार; नाना पटोले म्हणतात, भाजपच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही

भाजपमध्ये संघाची घराणेशाही, तिथं संघाच्या विचाराचा माणूस वर जातो, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.